माझे बालपण मराठी निबंध लेखन | Essay On Childhood in Marathi

माझे बालपण मराठी निबंध लेखन | Essay On Childhood in Marathi

काही दिवसापूर्वी मी एक लेख वाचला होता तो वाचल्यानंतर मला माझ्या बालपणातील काही प्रसंगांची आठवण आली. जरी चित्रपट असेल तर त्या चित्रपटातील सर्वात सुखाचा भाग म्हणजे आपले बालपण.

बालपणी अनुभवलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील मनुष्य किती सुखी व समाधानी असतो. अजून एका चांगल्या घरात राहतो पण माझे बालपण गेले एका दोन खोलीच्या कौलारू घरात. घराच्या आजूबाजूला काही पेरूची व फळांची झाडे होती.  आई बाबा जेव्हा शेतात जात होते तेव्हा मला आजी बाबांकडे ठेवायची. आजी बाबा माझा खूप लाड करायची.

अशा सुंदर गोड वातावरणात माझे बालपण गेले. सात वर्षाचा असताना मला शाळेत दाखल करण्यात आले.  मला शिकवायला दोन गुरुजी होते . तेथे मला खूप सवंगडी होते. बोल खेळणी नाटके बसविणे सहभोजन करणे या गोष्टी आम्ही दंग तसेच गणेशोत्सव दिवाळी दसरा ख्रिसमस या सणांची तर तर धमाल  धमाल उडालेली असे!

  चौथीच्या स्कॉलरशिप परीक्षेत माझा तिसरा क्रमांक आला माझी शाळा बदलली पहिले काही दिवस मी अस्वस्थ होतो मला माझ्या मित्रांची मित्र व गुरुजी यांची आठवण येत होती पुढे नव्या शाळेत व नव्या मित्रांपर्यंत हळूहळू मिसळून गेलो पाचवी ते दहावीपर्यंतच्या माझ्या या कालावधीमध्ये मी काही अनेक गोष्टी शिकलो यश मिळत गेले . या गोष्टी लिहिताना माझ्या संपूर्ण बालपण डोळ्यासमोर आले. दिवाळी किंवा उन्हाळ्यातील सुट्टीमध्ये मी माझ्या जुन्या बाल मित्रांना एकत्र करून एक छान गेट-टुगेदर साजरी करीन!

READ MORE  Maharashtra 10th SSC Board Exam Question Papers

 बालपण दे रे देवा ! अशी विनवणी संत तुकाराम महाराजांनी ईश्वरासमोर केलेली हे ईश्वर मला बालपण दे तू माझ्या जीवनातील सर्वात आनंददायी व सुखाचा क्षण होता. लहान असताना  घरच्यांसोबत सर्कस पाहण्यासाठी गेलो होतो. आई-बाबांनी पॉपकॉर्न गोड मिठाई घेऊन दिली होती. तरी देखील बिस्किट साठी मी हट्ट करीत होती. बालपणी हवी ती गोष्ट हट्ट करून मागता येत. मी पाचवीत असताना बाबांनी मला एक कॉम्प्युटर आणून दिले होते . त्यामध्ये एक गेम होती माझा भाऊ आणि मी दर रविवारी ती गेम खेळत होतो. आई मला आवडीचा पदार्थ करून द्यायची.

डिसेंबर महिन्यामध्ये गावाची जत्रा लागत असे. मी आई बाबा आजी आजोबा यांच्यासोबत जत्रा बघण्यासाठी जात होतो. जत्रेमध्ये पाळण्यांमध्ये बसणार विविध पदार्थांचा आस्वाद घ्यायचो. शाळेतून देखील पाच दिवसाची गणपतीपुळे या ठिकाणी सहल गेली होती. समुद्र बघण्यामध्ये मी एवढा गुंग झालो की बाकीचे सर्व पुढेनिघून गेले. मला वाटले की मी आता हरवलोच बघा पण बसचे ड्रायव्हर काका भेटल्यामुळे ते मला बस मध्ये घेऊन गेले. काही वर्षानंतर मी पुन्हा गणपतीपुळे या ठिकाणी गेलो होतो तेव्हा मला हा प्रसंग आठवला. या सर्व आठवणी मला माझ्या मनातील बालपण जिवंत ठेवते.

माझे बालपण मराठी निंबध | Majhe Balpan Marathi Nibandh

Leave a Comment