महापुराचे थैमान निबंध | महापुरावर निबंध मराठी। Essay On River Flood In Marathi
महापुराचे थैमान निबंध : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण सर्वजण महापुराची थैमान मराठी निबंध लिहिणार आहोत या निबंध लेखन करत असताना आपण असं समजायचं की आपल्या गावामध्ये महापूर आलेला आहेत आपल्या शहरांमध्ये महापूर आलेला आहेत आणि त्याचप्रमाणे आपण हा निबंध लिहायचा जेणेकरून आपल्याला निबंध लिहिण्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीत..
हा निबंध आपण खूप चांगल्या प्रकारे लिहू शकतात या निबंधामध्ये आपण खूप वेगवेगळ्या गोष्टी देखील मांडू शकतात चला तर आपण याच गोष्टी कशा मांडल्या पाहिजे याचा छोटासा प्रयत्न करूया तरीदेखील हा निबंध खूप पद्धतीने लिहू शकता म्हणून आपण आपल्या मनाने लिहावा आणि हा निबंध आपण फक्त वाचून घ्यावा जेणेकरून निबंध कसा लिहिला पाहिजे याची आपल्याला कल्पना येईल चला तर सुरुवात करूया आजच्या या नवीन निबंधाला महापुराचे थैमान मराठी निबंध.
महापूर मराठी निबंध | Mahapur Nibandh in Marathi
अरे उठा उठा पळा पळा असा आवाज आमच्या शाळेमध्ये आला आम्ही सर्वजण शाळेमध्येच होतो तेवढ्यात गावातील एक माणूस पळत पळत आमच्याकडे आला आमच्या सरांना सांगू लागला की गावामध्ये पाणी शिरत आहे गावा शेजारचा पाण्याचा डॅम हा खूप वेगाने सोडण्यात गेला आहेत. कारण हा पूर्ण भरला आहेत डॅमच्या दुसऱ्या बाजूला ढगफुटी झाली आहेत म्हणून डॅमचा पाणी पूर्णपणे मोकळं करण्याचा आदेश आला आहेत आणि हे पाणी एक सोबत मोकळं केल्यामुळे नदीला खूप जोराचा पूर आला आणि सर्व पाणी आमचा गावात भरू लागले म्हणून तो माणूस पळत पळत आमच्या शाळेत आला आणि आमच्या सरांना सांगू लागला की मुलांना लवकरात लवकर या गावाच्या बाहेर काढा सर्व आम्ही सर्वजण खूप घाबरलेलो होतो आमचे घरचे देखील आम्हाला घेण्यासाठी लगेच आले.
मी घरी गेलो घरामधील सर्व महत्त्वाच्या गोष्टी आम्ही घराच्या वरच्या मजल्यावर ठेवले आणि पैसे आणि इतर गोष्टी आमच्या सोबत घेऊन आम्हाला गाव सोडण्याचा आदेश मिळाला आम्ही जेवणासाठी काही गोष्टी घेतल्या त्याचप्रमाणे घरातील मौल्यवान धातू पैसे आणि इतर गोष्टी घेतल्या . आणि आमची गाडी घेऊन आम्ही गावाच्या कडेला आलो. आमच्या गावा शेजारी एक खूप मोठा डोंगर आहे आम्ही आमच्या सर्वांच्या गाड्या त्या डोंगरावर जाण्यासाठी रस्त्याने वरती आणल्या सर्व गावातील लोक त्या डोंगरावर येऊन उभे राहिले आणि त्या डोंगरावर एक मंदिर देखील आहेत मंदिराला गावातील लोकांनी खूप मोठे शेड टाकलेले आहेत मग आम्ही त्यामध्ये थांबलो आणि डॅमच्या बाजूला चालू असलेला पाऊस म्हणजेच ढगफुटी ही आमच्या गावाकडे देखील आली आणि आमच्या गावांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू झाला.
आम्ही सर्वजण खूप घाबरलेलो होतो कारण खूप जोराचा पाऊस त्यामध्ये खूप जोराचा वारा देखील चालू होता आम्ही सर्वजण एका डोंगरावर उभ असून या सर्व गोष्टी बघत होतो डॅम मधून खूप जोराचा पाणी देखील निघत होतं आणि नदीला पूर येऊन पूर्ण गावांमध्ये पाणी भरलेलं होतं. आमच्या गावामध्ये ही परिस्थिती असल्याकारणाने आमच्या गावामध्ये आपल्या देशाची इंडियन आर्मी देखील आलेली होती जे आम्हाला सर्वांना या मोठ्या महापुरातून वाचवण्याचे काम करत होते त्याचप्रमाणे आमच्या गावातील मोठे माणसं देखील यामध्ये खूप मदत करीत होते सर्वजण खूप घाबरलेले असून देखील एकमेकांची मदत करत होते.
गावातील सर्व लोक खूप चांगली आहेत कारण गावातील असलेले पाळीव प्राण्यांना गावातील सर्व लोकांनी बाहेर काढले कोणत्याही प्राण्याचा या महापुरामध्ये जीव गेला नाही तसंच कोणत्याही माणसांना या महापुरांमधून कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही कारण सर्व लवकर एकजूट झाली आणि या महापुरातून बाहेर पडले परंतु आमच्या गावाच्या शेजारी देखील खूप सारे गाव आहेत आणि त्या गावांना शेजारी कुठे डोंगर नसल्याकारणाने त्या लोकांची खूप हाल होत होती मग आमच्या गावाने पहिल्यांदा आमच्या गावातील सर्व लोकांना बाहेर काढले आणि त्यानंतर इंडियन आर्मी सोबत शेजारच्या गावांमध्ये देखील जाऊन मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.
जोराचा पाऊस चालू असला तरी देखील माणसांनी एकमेकांची मदत करून या महापुरातून बाहेर पडण्याचा खूप चांगला असा प्रयत्न केला त्यानंतर गावात शेजारचे गाव देखील या महापुरातून बाहेर निघाले परंतु गावाची परिस्थिती खूप गंभीर झालेली होती गावातील खूप सारे जुने घर या महापुरामध्ये पडली गावांमधील सर्व घरांमध्ये पाणी भरलं त्या कारणाने घरामधील वस्तू देखील खूप खराब झाल्या दुकानांमध्ये वस्तू देखील खूप खराब झाल्या ज्या घरांना दोन मजली होते त्या घरांमधील वस्तू वाचल्या परंतु महापूर म्हणलं की मोठ्या प्रमाणात नुकसान देखील गावकऱ्यांना सहन करावं लागलं. हळूहळू महापौर कमी होऊ लागला पाऊस थांबला त्यानंतर नदीचे पाणी देखील थांबले आणि मग सात ते आठ दिवसानंतर आम्हाला सर्वांना आमचे गाव दिसू लागले आणि मग आम्ही सर्वजण घरी गेलो आणि घरातील झालेल्या सर्व गोष्टींना नीट करून ज्या लोकांची घर पडली आहेत त्यांना त्यांचे घर परत बांधण्यासाठी मदत केली आणि अशाच प्रकारे या महापुरातून बाहेर पडलो.
मी पाहिलेला महापूर मराठी निबंध | Mi Pahilela Mahapur Marathi Nibandh
मित्रांनो आपल्याला हा महापुराचे थैमान मराठी निबंध कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा त्याच पद्धतीने आपल्याला या निबंधामध्ये अजून कोणत्या गोष्टींना सांगायचे होते ते देखील आम्हाला सांगा आणि निबंध लिहीत असताना आपण देखील अशाच प्रकारे निबंध लिहू शकता मी हा निबंध लेखन गावासाठी केला आहे तुम्ही हा निबंध लेखन शहरासाठी देखील करू शकता जेणेकरून आपल्याला शहरांमधील हकीगत महापूर आल्यानंतर कशी होऊ शकते हे इतर विद्यार्थ्यांना देखील सांगू शकता आपण लिहिलेला निबंध हा आपण कमेंट मध्ये नक्की काका जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील यापासून खूप मदत होईल एवढे बोलूनच आज मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद.