शेतकऱ्याची आत्मकथा निबंध | Shetkaryachi Atmakatha in Marathi
मी एक छोटा शेतकरी आहे महाराष्ट्रामध्ये एका गावामध्ये माझी छोटी जमीन आहे फारशी सुपीक नाही पण नापीक देखील नाही अशा या जमिनीमध्ये मी शेती करतो आणि आपल्या सर्वांचे पोट भरवण्याचे काम करत आहे. माझ्या आधीपासून च्या आत्तापर्यंतच्या सर्व पिढ्या याच जमिनीवर पोचल्या आहे म्हणजेच याच जमिनीचा वापर करून त्यांनी त्यांचे जीवन जगले आहेत माझे माझ्या या जमिनीवर खूप प्रेम आहे आणि मी या जमिनीवर पीक उभे करून त्या पिकाचा खूप काळजी घेतो आणि त्या पिकांमधून मिळालेल्या पैशांमधून माझा संसार चालवण्याचे काम करतो.
आमच्या गावाजवळ कोणत्याही प्रकारच्या पाठ किंवा नदी नाही पाण्याची कायम अडचण असल्यामुळे आम्हाला उन्हाळ्यामध्ये आमच्या शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचे पीक घेता येत नाही तर ही देखील मी आमच्या शेतीमध्ये ड्रॅगन फ्रुट नावाचा बाग लावलेला आहेत. शेतकरी कायमच शेत नांगरतो त्यामध्ये पीक उभा करतो आणि त्यामधून त्याला चांगला मोबदला भेटला तर ठीक नाहीतर त्याला त्याच्या खिशातून पैसे घालावे लागतात या सर्व गोष्टी मी पाहत आलो आहे याच गोष्टींपासून लांब जाण्यासाठी मी माझ्या शेतामध्ये कमी पाण्याचा वापर करून जास्त उत्पन्न घेणारे फळबाग म्हणजेच ड्रॅगन फ्रुट या फळाची बाग लावली आहे.
उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई असली तरी देखील ड्रॅगन फ्रुट या फळाच्या झाडांना जास्त काही फरक पडत नाही त्यानंतर मृगाचे नक्षत्र लागले की पावसाला सुरुवात होण्यास सुरुवात होते पहिल्या दहा दिवसांमध्ये माझ्या शेतातील सर्व झाडे हिरवीगार होतात आणि ड्रॅगन फ्रुट च्या झाडांना फुले देखील यायला सुरुवात होते तेव्हापासून माझ्या शेताचे उत्पन्न चालू होते.
त्याचप्रमाणे मी माझ्या शेताच्या काही भागांमध्ये विविध प्रकारचे पिकं देखील घेत असतो ही पिकं घेत असताना मला खूप जास्त प्रमाणात अडचणी येतात त्या म्हणजे उन्हाळ्यामध्ये मी जेव्हा माझे शेत नांगरतो तेव्हा त्या शेतामध्ये खूप सारे ढेकळ बाहेर निघतात. ती सर्व ढेकळ फोडण्यापासून तर पावसाची वाट बघण्यापर्यंतच्या सर्व अडचणी मी पाहिल्या आहेत पाऊस झाल्यानंतर पेरणी करून त्या पेरणीला चार ते पाच महिने संभाळायचे जीव लावायचे त्यामध्ये पाऊस झाला नाही तर पाणी देखील विकत टाकावे लागतात या सर्व अडचणी मधून मी शेती केलेली आहेत आणि करत आहे.
शेती करत असताना आपल्याला आत्ताच्या आधुनिक उपकरणांचा वापर देखील केला पाहिजे त्याचप्रमाणे शेतीमध्ये देखील आपण अभ्यास केला तर आपण शेतीतून चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेऊ शकतो असं मी एक शेतकरी म्हणून आपल्यासोबत माझे मनोगत व्यक्त करत आहे एवढे बोलूनच मी आज या ठिकाणी थांबतो.