माझी आई निबंध मराठी 300 शब्द | माझी आई निबंध मराठी | Majhi Aai Nibandh Marathi

माझी आई निबंध मराठी 300 शब्द | माझी आई निबंध मराठी Majhi Aai Nibandh Marathi

आई खरंच काय असते ?
 लेकराची माय असते
वासराची  गाय असते
दुधाची साय असते
लंगड्याचा पाय असते
धरणीची  ठाय असते

वरील वर्णन केलेल्या कवितेमध्ये ज्याप्रमाणे आई शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजेच आई.

मातृत्व हा एक असा गुण आहे जो गर्भधारण केल्यापासून आत्मसात होतो. फक्त मनुष्य मध्येच नाही तर पशु पक्षांमध्ये देखील आपण बघतो. जसे गाईला वासरू झाल्यानंतर ती त्याला चाटते आपली मातृत्वाची भावना व्यक्त करते त्याला जवळ घेते.

प्राचीन ग्रंथांमध्ये ईश्वर म्हणजे आई असे वर्णन केले आहे जन्म देण्यापासून बाळाचे संगोपन करणे त्याला चांगली काय वाईट काय याची शिकवण देणे . संस्कार आदर्श शिस्त स्वच्छता नियम या त्याबद्दल त्याला मार्गदर्शन करणे .

आईचे आपल्या बाळाबद्दल असणारे प्रेम हे कोणत्याही तराजू मध्ये मापले जाऊ शकत नाही ज्याप्रमाणे आकाशाचा काही अंत नाही.

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या ओळीचा अर्थ असा आहे की आईची प्रेम हे पैशांनी विकत घेता येत नाही व सर्व साधन संपत्ती असून देखील आयुष्यामध्ये आई नसेल तर प्राप्ती होत नाही. याचप्रमाणे माझ्या आई बद्दल लिहिताना मला आठवते की आमच्या  घराचा पाया आहे ती ज्या प्रकारे कोणतीही वास्तू बांधताना पाया भक्कम पाहिजे त्याचप्रमाणे घरात सुख व शांती टिकवून ठेवण्यासाठी आई ही महत्त्वाची भूमिका निभावते माझी आई ही माझी एक मैत्रीणच आहे माझ्या आयुष्यातील सुखदुःखाची जाणीव तिला न सांगता होते.

सहन करताना वेदना मुखातून एकच शब्द सदा तो म्हणजे आई. आयुष्यातील असाच एक प्रसंग मला आठवतो शिक्षणासाठी काही वर्ष मी दुसऱ्या शहरांमध्ये राहिली तेव्हा तिथे रोज जेवण करताना मला माझ्या बनवलेल्या जीवनाची आठवण येत होती मी आणि माझा लहान भाऊ नेहमी छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडायचं तेव्हा आई आम्हाला ओरडायची समजून सांगायचे ते शब्द मला आठवायचे घरी जायची ओढ लागायची कधी आईचा आवाज ऐकू येईल याची चाहूल लागायची.

माझी आई आर्थिक परिस्थितीमुळे तिचे शिक्षण पूर्ण करू शकले नाही त्यामुळे तिने कष्ट करून मला शिकवले . स्वतःची स्वप्न पूर्ण कर असे सांगून तिने मला दुसऱ्या शहरात शिकण्यासाठी पाठवले होते.

ज्याप्रमाणे जिजाऊ माता ने शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली त्यांच्या मार्गदर्शनामुळे जनतेचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज घडले धन्य ती मातोश्री . अशा प्रकारे इतिहासामध्ये अनेक अशी थोर व्यक्ती होऊन गेली ज्यांच्या यशामागे त्यांच्या आईची शिकवण आहे.

माझ्यासाठी केलेल्या सर्व गोष्टी आठवल्या की मनात येते की लहानपणापासून प्रत्येक यशाच्या मागे तिचे मार्गदर्शनाचे महत्त्व समजते. ती सकाळी त्यांच्या आधी उठणार मग देवपूजा करते स्वयंपाक व माझ्यासाठी छान छान पदार्थ देखील बनवते. माझ्या मैत्रिणींना माझ्या आईच्या हातचे जेवण खूप आवडतात. तुमचे काम संपवून ती शेतातील कामाला मदत करते. मला आठवते बापूजी म्हणतात एक आई शंभर गुरुंनी श्रेष्ठ आहे कारण लहानपणी आई ने सांगितलेल्या रामायण महाभारत यामधील गोष्टींद्वारे ती चांगले काय वाईट काय आपण कोणाची हानी करायची नाही अशा काही गोष्टी मला आठवतात . या गोष्टी मला.निर्णय घेण्यासाठी उपयोगात येतात. आई थोर तुझे उपकार

मनापासून आईचा विरोध ज्याच्या आयुष्यामध्ये आहे त्याची आयुष्य किती दुःखी असेल असा विचार करून त्या मनात एकच विचार येतो की इतरांनी कितीही प्रेम केले माया केली त्याची तुलना आईच्या प्रेमाची होऊ शकत नाही.

माझी आई निबंध मराठी – Essay on My Mother in Marathi

Leave a Comment