क्रिडांगणाचे मनोगत मराठी निबंध | Kridangana Che Manogat Marathi Nibhand

क्रिडांगणाचे मनोगत मराठी निबंध | Kridangana Che Manogat Marathi Nibhand

हे पहा मुलांनो अरे इकडे तिकडे कुठे बघतात इथे बघा भरकटू नका. अरे मुलांनो आपण जिथे उभे आहात ना ते मैदान म्हणजे मीच हो मीच मैदान बोलतोय . तुम्ही या मैदानावर खेळण्यासाठी तुमच्या मित्राची वाट बघत आहे ना म्हणलं तो मित्र येईपर्यंत मी तुमच्याशी गप्पा मारतो . म्हणून तुम्हाला हाक मारली.

अरे मुलांनो तुम्ही माझ्याजवळ आला तर मी खूप आनंदी असतो तुम्ही जेव्हा माझ्यावर खेळतात वेगवेगळे गेम खेळत असतात तेव्हा मला खूप आनंद होतो तुम्ही आल्यानंतर तुमच्या चर्चा ऐकण्यास मला खूप मजा येते शाळेमध्ये ज्या ज्या गोष्टी होतात त्या सर्व गोष्टी तुम्ही शाळेतून आल्यानंतर मैदानावर सांगत असतात मग मी तुमच्या सर्व गोष्टी ऐकत असतो आणि तुमच्या सोबत दिवसभर काय झालं त्या गोष्टी सर्व मला समजतात.

क्रीडांगणावर तुम्ही खूप सार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या खेळ खेळतात या खेळांची देखील मजा मी घेत असतो म्हणजेच मुलांनो तुम्ही आता तुमचे मित्र आल्यानंतर तुम्ही क्रिकेट खेळणार आहात मग क्रिकेट खेळत असताना मी तुमच्या सर्वांची मजा बघत असतो कोण कसं खेळत आहे कोण कुठे उभे आहेत कुणी काय केलं पाहिजे या सर्व गोष्टी मला माहित असतात आणि मी या गोष्टींचीच मजा घेत असतो तुम्ही केलेला चुका त्याचप्रमाणे तुमच्याकडून खेळण्यात आलेल्या चांगल्या गोष्टी या सर्व मी दररोज बघतो म्हणून मला सर्व खेळ माहीत झालेली आहेत.

माझा जन्म झाला तेव्हापासून आतापर्यंत हजारो मोठमोठाली व्यक्ती माझ्याकडून तयार झालेली आहेत म्हणजेच शेकडो मुलं माझ्यावर खेळून गेलेली आहेत त्यापैकी काही तेंडुलकर म्हणली तर काही विराट कोहली बनली तर काही धोनी बनली त्याचप्रमाणे इतर खेळांचे देखील खूप मोठमोठे खेळाडू माझ्यापासूनच तयार झालेली आहेत हे सर्व खेळाडू मी ते आल्यापासूनच बघत आलेलो आहेत ते दररोज किती कष्ट घेतात हे मलाच माहिती तुम्ही सर्वजण त्या खेळाडूला फक्त बाहेरून बघतात परंतु ते क्रीडांगणावर किती वेळ मेहनत घेतात या सर्व गोष्टी तुम्ही बघतात का बघत नसाल तर मी तुम्हाला सांगतो हे मोठ मोठाले खेळाडू क्रीडांगणावर चार चार पाच पाच सात सात तास घालतात ते खूप कष्ट घेतात म्हणून ती इतकी मोठी झाली आहेत.

तुम्हाला देखील मोठ्या व्हायचं असेल तर तुम्ही देखील खूप खेळा खेळ कसा खेळला जातो हे शिकून घ्या आणि खेळाकडेच लक्ष द्या जेणेकरून आपण देखील त्या मोठ्या व्यक्तींसारखे एक दिवशी नक्की मोठे व्हाल.

माझा जन्म होण्याअगोदर या ठिकाणची जमीन मोकळीच पडलेली होती माझ्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढू लागली या ठिकाणी शहराचे निर्माण होऊ लागले आणि तुमच्यामुळे तुमच्यासाठीच मला या ठिकाणी क्रीडांगण म्हणून बनवण्यात आले तेव्हापासून तर आतापर्यंत मी तुम्हाला बघत आलेलो आहेत तुमच्यासाठी या ठिकाणी आहेत. माझ्या अवतीभवती हजारो लोक राहतात याच लोकांनी विचार केला की आता आपल्या लेकरांसाठी खेळण्यासाठी जागा असली पाहिजे मग जागा म्हणून माझा निवड करण्यात आली आणि मलाच क्रीडांगण बनवले मी खूप आनंदी आहेत कारण की माझ्यामुळे तुम्ही सर्वजण या ठिकाणी खेळ खेळू शकतात. मी क्रीडांगण आहे म्हणून मला खूप आनंद वाटतो.

क्रीडांगणाचे मनोगत निबंध | क्रीडांगणाचे आत्मकथा मराठी निबंध | Autobiography of Playground in Marathi

Leave a Comment