माझी शाळा मराठी निबंध | Majhi Shala Marathi nibandh

माझी शाळा मराठी निबंध | Majhi Shala Marathi nibandh

माझी शाळा मराठी निबंध : विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझी शाळा यावर मराठी निबंध बघणार आहोत शाळा म्हणलं की सर्वांच्या आयुष्यातले सुखाचे क्षण असतात. माझी शाळा मराठी निबंध हा निबंध खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना हा निबंध खूप वेळा विचारला जातो त्यामुळे हा निबंध एकदा वाचून घ्या हा निबंध तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल अशी मी आशा करते चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला माझी शाळा मराठी निबंध.

माझी शाळा मराठी निबंध | Majhi Shala Marathi nibandh

माझी शाळा मराठी निबंध (my School Essay In Marathi)

माझ्या शाळेचे नाव पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय हे आहे माझी शाळा लोणी या गावातील सर्वात मोठी शाळा म्हणून ओळखली जाते. माझ्या शाळेमध्ये खूप चांगल्या प्रकारचे शिक्षक उपलब्ध आहेत आणि प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे शिक्षक येथे उपलब्ध आहे आणि ते देखील प्रचंड शिकलेले शिक्षक आहेत.

आमच्या शाळेमध्ये एक मोठं वाचनालय देखील आहे जिथे आम्हाला फ्री मध्ये पुस्तक वाचायला भेटतात आम्हाला निशुल्क तिथे सर्व काही गोष्टी भेटतात. तुमच्या शाळेमध्ये मी देखील जास्त नाहीये आमची शाळा ही गरिबांसाठी बनलेली शाळा आहे परंतु या शाळेमध्ये खूप श्रीमंतांचे मुलं देखील असतात कारण येथे शिक्षण येथे खूप चांगल्या प्रकारचे शिक्षण भेटतं.

आमच्या शाळेला एक भव्य पटांगण आहे जेथे आम्ही खेळ खेळतो. आम्हाला दिवसांमध्ये एक तास तरी खेळाचा असतो जिथे आमचा शारीरिक व्यायाम करून घेतला जातो त्यामुळेच आमचं शारीरिक स्वास्थ्य देखील चांगलं आहे आणि आम्ही अभ्यासात देखील चांगले आहोत. आम्हाला इथे नुसता अभ्यासच नव्हे तर विविध प्रकारचे खेळ शिकवले जातात त्याचप्रमाणे विविध प्रकारचे ज्ञान येथे भेटत. इथे मला खेळायला शिकवतात आम्हाला वाचनालयामध्ये पुस्तक वाचायला नेतात आम्हाला प्रात्यक्षिक करायला शिकवतात विविध प्रकारच्या गोष्टी आमच्याकडून येथे करून घेतात.

READ MORE  माझा आवडता सण दिवाळी | Maza Avadta San Diwali Marathi Nibandh

आमच्या शाळेची इमारत खूप भव्य आहे आमच्या शाळेला तीन इमारती आहेत पहिली इमारत म्हणजे पूर्ण इंग्लिश मीडियम दुसरी सेमी इंग्लिश आणि तिसरी मराठी मिडीयम अशी तीन प्रकारचे शिक्षण येथे भेटते परंतु फी तिथे जास्त नाही. इंग्लिश मीडियम ला हजार रुपये फी सेमी इंग्लिश ला 500 तर मराठी मिडीयम हे पूर्णपणे फ्री येथे शिकवलं जातं.

आमची शाळा कर्मवीर भाऊराव यांची शाळा आहे आमची शाळा रयत शिक्षण संस्था आहे जी कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केलेली आहे. आम्हाला त्यांचा खूप अभिमान वाटतो. आमच्या शाळेमध्ये जे वस्तीगृह आहे तिथे सर्व काही गोष्टी फुकट मिळतात तिथे गरिबांची मुलं राहून शिक्षण घेतात आणि तिथे थोडी सुद्धा पैसे देण्याची गरज नसते.

आमच्या शाळेतील मराठी मिडीयम च्या विद्यार्थ्यांना देखील इंग्लिश शिकवली जाते ते देखील इंग्लिश मिडीयम च्या मुलांसारखे इंग्लिश बोलतात. माझी शाळा ही लोणीच्या मध्यभागी वसलेली आहे. लोणी हे गाव आहे.

माझ्या शाळेमध्ये विविध प्रकारचे खेळ खेळण्यासाठी साहित्य उपलब्ध आहेत माझ्या शाळेमध्ये लेझीमचा पथक आहे ढोलाचे पथक आहे आणि आमच्या शाळेमध्ये ज्या सकाळी प्रार्थना होतात त्या देखील आमच्या शाळेतले मुलं मुलीच म्हणतात आमच्या शाळेमध्ये पेटी वाजवणारे देखील मुलं मुली आहेत विविध प्रकारच्या येथे ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. इंग्लिश मीडियम च्या लाखो ने फी घेणाऱ्या शाळांना देखील लाजवेल अशी ही आमची शाळा आहे.

आणि आमच्या शाळेमध्ये कचरा साफ करायला कोणीही व्यक्ती काम करत नाही आम्ही विद्यार्थीच आमचा वर्ग आमची शाळा स्वच्छ ठेवतो आमच्या शाळेमध्ये ठिकठिकाणी डजबीन आहेत जेणेकरून आम्ही काहीही कचरा झाला की त्यामध्ये उचलून टाकतो पण आमच्या शाळेतले विद्यार्थी इतके चांगले आहेत की ते कचरा करतच नाही आम्ही आमची शाळा चांगली कशी राहील याचा नेहमी विचार करतो आमच्या शाळेमध्ये जर मैदानावर गवत झालं तर आम्ही आमच्या खेळाच्या तासाला ते गवत उपटून टाकतो आणि आम्ही आमच्या शाळा आमच्या परीने स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो आमची शाळा खूप शिस्तप्रिय शाळा आहे. अशी माझी स्वच्छ सुंदर शाळा मला फार फार आवडते.

READ MORE  माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध | Majha avadta pakshi mor

माझी शाळा निबंध मराठी | Majhi shala nibandh marathi

विद्यार्थी मित्रांनो माझी शाळा मराठी निबंध हा तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि यामध्ये काही चुका तुम्हाला आढळून आले असतील तर त्या देखील मला कळवा जेणेकरून मी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि हा निबंध खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो हा निबंध तुम्हाला पूर्णपणे पाठ करून जाण्याची काहीही आवश्यकता नाहीये फक्त माझी शाळा मराठी निबंध यातले तुम्ही काही काही मुद्दे बघून घ्या जे तुम्हाला आवश्यक वाटतय आणि ते तुम्ही परीक्षेमध्ये आठवा तुम्हाला नक्कीच आठवतील आणि त्यानुसार तुम्ही तुमचा निबंध पूर्ण करा आणि मी तुम्हाला पूर्णपणे सांगू शकते की हा निबंध तुम्हाला पैकी चे पैकी मार्क मिळवून देऊ शकतो मी तुम्हाला अशाच प्रकारचे आणखी निबंध बघायचे असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन बघू शकता मी तिथे सर्व प्रकारचे निबंध उपलब्ध करून दिलेले आहेत.

धन्यवाद

Leave a Comment