माझा आवडता सण दिवाळी | Maza Avadta San Diwali Marathi Nibandh

माझा आवडता सण दिवाळी | Maza Avadta San Diwali Marathi Nibandh

माझा आवडता सण मराठी निबंध : विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझा आवडता सण दिवाळी या विषयावर निबंध बघणार आहोत दिवाळी म्हणलं की सर्वांनाच उत्सुकता लागून असते ती म्हणजे फटाकड्यांची गोड गोड खाण्याची त्यामुळे दिवाळी हा सण सर्वांचाच आवडीचा असतो .

दिवाळी मध्ये सर्वांना सुट्टी देखील असते आणि सर्व पाहुणे मंडळी आपले नातेवाईक एकत्र येऊन गप्पा मारतात त्यामुळे दिवाळी सण हा सर्वांसाठीच खूप खास असतो आणि माझा आवडता सण दिवाळी या विषयावर अनेकदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो विशेषतः हा प्रश्न प्रथम सत्राच्या पेपरमध्ये विचारला जातो.

कारण प्रथम सत्र संपल्यानंतर लगेचच दिवाळी येते. चला तर मग आज सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला माझा आवडता सण दिवाळी मराठी निबंध

माझा आवडता सण दिवाळी |maza avadta San Diwali Marathi nibandh

दिवाळी वर मराठी निबंध | माझा आवडता सण दिवाळी निबंध मराठी

आपला भारत देश हा खूप मोठा देश आहे इथं असंख्य लोकसंख्या आहे आणि यामध्ये सर्व जातीचे धर्माचे पंथाचे लोक एकत्र मिळून मिसळून आनंदाने राहतात सर्व जातींचे सर्व धर्मांचे वेगवेगळे सण असतात परंतु सर्वजण एकमेकांच्या सणांमध्ये आनंदांमध्ये सहभागी होतात असा हा भारत देश महान आहे. आणि मला अभिमान आहे मी भारतात राहते कारण इथे सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात आणि एकमेकांचे सण स्वतःचे सण असल्यासारखे साजरे करतात.

इथे प्रत्येक जातीचे वेगवेगळे सण मानले जातात किंवा साजरे केले जातात परंतु यामध्येच हिंदू धर्माचा एक सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि हा सण सर्वच जण साजरे करतात हिंदू मुस्लिम सर्वच. दिवाळी या सणाला सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देतात आणि गोडधोडाचे घरी खायला बोलवतात.

दिवाळीमध्ये पंधरा ते वीस दिवसांची सुट्टी देखील दिली जाते. दिवाळीमध्ये करंजी लाडू चकल्या शेव पुऱ्या अशा प्रकारचे विविध खाण्याचे पदार्थ बनवले जातात आणि ते पदार्थ सर्वांसोबत वाटले देखील जातात. मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना सर्वांना हे पदार्थ दिले जातात. दिवाळीचा पहिला दिवस असतो तो म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी घरातल्या सर्व धनाजी साहित्याची हत्यारांची पूजा केली जाते. त्यानंतर वसुबारस आणि मग लक्ष्मीपूजन चा दिवस येतो लक्ष्मीपूजन च्या दिवशी सकाळी उठून आम्ही सर्वजण तयार होतो आणि घरासमोर सुंदर अशी रांगोळी काढतो.

दिवाळीमध्ये नवनवीन कपडे घेतले जातात आणि ते कपडे घालून सगळीकडे फिरता येतं संध्याकाळी लक्ष्मीपूजन च्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि त्यानंतर आपण जे खाद्यपदार्थ बनवलेले असतात त्यांना खाता येतं. संध्याकाळी आम्ही खूप फटाके फोडतो मज्जा करतो. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीचा दिवस म्हणजे पाडवा आणि तिसऱ्या दिवशीचा दिवस म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी माझ्या भावाला ओवाळते आणि मला खूप आनंद होतो कारण हा दिवस बहीण भावाच्या नात्याचा प्रतीक मानला जातो.

आणि भाऊबीज मला जास्त आवडते कारण त्या दिवशी माझी आत्या आमच्या घरी येते आणि मला माझी आत्या फार आवडते आणि मला जेव्हा आमच्या घरी कोणी पाहुणे येतात तेव्हा मला खूप आनंद होतो त्यांच्यासोबत गप्पा मारायला आवडतात त्यांच्यासोबत वेळ घालवायला मला आवडतो.

अरे दिवाळीमध्ये काही वैताग पण नसतो कारण दिवाळीच्या आधी सर्व पेपर होऊन गेलेले असतात त्यामुळे परीक्षेचा देखील टेन्शन नसतं आणि कुठल्याच प्रकारचा त्रास नसतो दिवाळीमध्ये फक्त मज्जा मज्जा आणि मज्जा दिवाळी म्हणजे फक्त मज्जा.

मी लहान होते तेव्हा माझ्या मामाच्या घरी जायचे आणि आम्ही सर्व मामाची मुलं मुली आणि आम्ही मिळून मस्त असा किल्ला बनवायचा दिवाळीला आणि तो किल्ला बनवण्याची मज्जा आहे ती आता बनवन्यात नाही.

आणि दिवाळीमध्ये गोड गोड खाद्यपदार्थ खायला भेटतात सुट्टी भेटते फिरायला मिळतं मामाकडे जायला मिळतो या सर्व गोष्टींमुळे मला हा दिवाळी सण खूप खूप खूप आवडतो.

दिवाळी वर मराठी निबंध । माझा आवडता सण दिवाळी निबंध

विद्यार्थी मित्रांनो माझा आवडता सण दिवाळी हा निबंध तुम्हाला जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हा निबंध खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो तुम्हाला हा निबंध पाठ करून जाण्याची अजिबात आवश्यकता नाहीये तुम्ही फक्त हा निबंध एकदा वाचून जा त्याचे जे मेन मेन पॉइंट्स आहेत ते तुम्ही वाचून जा तुम्हाला हे पण नक्कीच पेपरला आठवतील अशी मी तुम्हाला गॅरंटी देते आणि आपल्या वेबसाईटवर विविध प्रकारचे निबंध उपलब्ध आहेत ते देखील एकदा बघून जातील देखील निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात आणि जर हा निबंध वाचून तुम्हाला काही मदत झाली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्या प्रतिक्रिया ऐकून मला खूप आनंद होतो आणि नवीन निबंध लिहायला उत्साह भेटतो.

धन्यवाद

Leave a Comment