पावसाळा मराठी निबंध | Marathi Nibandh on Rainy Season

पावसाळा मराठी निबंध | Marathi Nibandh on Rainy Season

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये आपण सर्वजण पावसाळा मराठी निबंध लिहिणार आहोत. हा निबंध लिहीत असताना आपण पावसाळ्यामध्ये गोष्टी या निबंधामध्ये लिहू शकतात आपल्याला पावसाळ्यात आलेले प्रसंग आपण या निबंधात लिहू शकता त्याचप्रमाणे आपण पावसाळ्याला कसं बघतात याची देखील कल्पना आपण करू शकतात.

म्हणून आपण हा निबंध आपल्या मनाने खूप चांगल्या रित्या देऊ शकतात आम्ही तुम्हाला फक्त एक नमुना म्हणून निबंध लिहून दाखवतो जेणेकरून आपल्याला निबंध कसा लिहायचा याची कल्पना येईल चला तर सुरुवात करूया आजच्या या नवीन निबंधाला आणि वाचूया मी पाहिलेला पावसाळा किंवा पावसाळा मराठी निबंध.

पावसाळा ऋतू मराठी निबंध | Essay on Rainy Season in Marathi

निसर्गातील हिरवटपणा गवतातील चकाकी हिरवेगार झाडे वातावरणात थंड पणा आणि मातीचा चांगला वास हा आपल्या सर्वांना आठवतोच हे सर्व पावसाळा सुरू झालं की आपल्याला पाहायला मिळतं. पावसाच्या अगोदर झाडे खूप सुरकटलेली असतात त्यांना पाणी कमी असते म्हणून परंतु पाऊस झाल्यानंतर तीच झाडे हिरवीगार होतात टवटवीत दिसायला लागतात झाडांवर ती बसलेली धूळ देखील पावसाच्या पाण्यात धुवून निघते म्हणून झाडे अजून निरखून दिसतात निसर्ग हा सौंदर्य अतिशय मनमोहक होतो.

पावसाळा सुरू झाला की नदी तलाव विहिरी आणि इतर पाणी साचवण्याची सर्व ठिकाणी पूर्ण भरतात जेणेकरून वर्षभर परत आपल्याला पाण्याची कोणत्याही प्रकारची टंचाई भासत नाही मी भंडारदरा या धरणा जवळ राहतो पाऊस झाला की भंडारदरा धरण पूर्ण भरते आणि त्यानंतर नदीला पाणी सुटलं की नदीच्या आसपासची सर्व गावे हिरवीगार होतात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यामध्ये सर्व डोंगर सर्व ठिकाणी हिरवीगार दिसतात म्हणून मला पावसाळा खूप आवडतो.

READ MORE  झाडाची आत्मकथा निबंध मराठी | Mi Zad Boltoy Nibandh Marathi

पाऊस झाला की शेतकरी शेतातील सर्व कामे सुरू करतो शेतामध्ये नांगरणी पेरणी अशा विविध कामांना शेतकऱ्याला आणि त्यानंतरच काहीच दिवसांमध्ये सर्व शेत पिकांनी हिरवेगार दिसायला सुरुवात होतात हे दृश्य खूप चांगले आहेत. उन्हाळा भर आपण सर्वजण सगळीकडे पाण्याची टंचाई बघतो आणि पावसाळा सुरू झाला की निसर्ग आपल्याला इतका पाणी देतो की तेच पाणी आपल्याला नको नको असे होतं. जिकडे पहावं तिकडे पाणी जिकडे पहावं तिकडे चिखल आपल्याला जास्त पाऊस झाला तरी नको नको असं होतं आणि पाऊस झाला नाही तर आपण सर्वजण पावसाची वाट बघत असतो.

पाऊस आल्यानंतर पावसामध्ये खेळण्यांमध्ये जी मजा आहे ती मजा आपल्याला कुठेच भेटणार नाही परंतु आपण पावसाच्या पाण्यात खेळल्यानंतर घरात तीच कपडे घेऊन आलो की आपल्याला आईचे बोलणे देखील तेवढेच खावे लागतात आई खूप रागावती कारण आपण पूर्ण भिजलेलो असतो आपली कपडे घाण झालेली असती तरीदेखील आपण सर्वजण पावसामध्ये खेळतो पावसामध्ये लहानपणी आपण सर्वजण होडी बनवून तिला पाण्यामध्ये सोडलंच असेल किंवा गारांचा पाऊस झाल्यानंतर बर्फ गोळा करून खायलाच असेल. या सर्व गोष्टी आपण पावसाळ्यात करतो.

पाऊस सुरू असताना जर सूर्य आला सूर्याची करणे आपल्याला पाऊस सुरू असतानाच पडायला सुरुवात झाली तर आपण आकाशाकडे पाहिल्यानंतर आपल्याला इंद्रधनुष्य देखील बघण्यासाठी मिळतो तो खूप सुंदर दिसतो आणि आपण त्याला मन भरून बघतो तरीदेखील तो इंद्रधनुष्य किती मोठा आहेत हे आपल्याला समजत नाही त्याचप्रमाणे आपल्याला पावसाळ्यामध्ये आपण जर नदी किंवा ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी राहत असो तर आपल्याला बेडकाचा आवाज देखील खूप जास्त प्रमाणात येत असतो या सर्व गोष्टींमुळे मला पावसाळा खूप आवडतो.

READ MORE  मकर संक्रांत मराठी निबंध | Makar Sankranti Essay in Marathi

पावसाला निबंध मराठी | Pavsala Nibandh Marathi

मित्रांनो आपल्याला वरती दिलेला पावसाळा निबंध कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा तुम्हाला पावसाळा हा ऋतू आवडतो का व आवडत असेल तर का आवडतो हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्हाला आपल्याला पावसाविषयी काय माहित आहे हे समजत आपण आम्हाला पावसात मध्ये अनुभवलेला एखादा दिवस हा देखील सांगू शकता जेणेकरून इतर मित्रांना देखील याची मदत होईल एवढे बोलूनच आज मी या ठिकाणी हा निबंध थांबवतो धन्यवाद.

Leave a Comment