सिमेवरील जवान चे मनोगत मराठी निबंध | Me Sainik Boltoy Essay In Marathi

सिमेवरील जवान चे मनोगत मराठी निबंध | Me Sainik Boltoy Essay In Marathi

एक वर्ष झाले घर सोडल्यापासून त्या अगोदर एकदा घरी गेलो ते देखील पाच दिवसासाठी पण सीमेवर अचानक झालेल्या गडबडीमुळे मला माझी मिळालेली सुट्टी रद्द करावी लागली वरून ऑर्डर आले आणि मला परत सीमेवर यावे लागले. तातडीने निर्णय निघालेला होता म्हणून घरच्यांना सोडून तसंच परत सीमेवर निघालो तर डोळे पुसद घरच्यांनी मला निरोप दिला मी घर सोडले आणि सीमेच्या प्रवासाला लागलो सीमेवर गेल्या गेल्या लढाईसाठी तयार झालो आणि आपल्या या भारत मातेसाठी लढा देऊ लागलो युद्ध संपल्यानंतर मला मनाला खूप दिलासा मिळाला घरी फोन झाला घरचे देखील आनंदी झाले आणि माझी मिळालेली सुट्टी देखील तशीच रद्द राहिली.

तेव्हापासूनच मी या युद्ध झालेल्या ठिकाणावरच पहारा देत उभा आहे. सीमेवर आम्हाला सर्व सैनिकांना खूप लक्षपूर्वक राहावं लागतं कारण शत्रू कधी आपल्यावर आक्रमण करण हे कोणालाच माहीत नसतं शत्रूपासून वाचून आपल्या या देशाचे रक्षण करणं हे आमच्या सैनिकांचे जबाबदारी आहेत त्याच पद्धतीने आपल्या देशामध्ये राहून आपल्या देशाला पुढे घेऊन जाणं ही तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे. आम्ही सीमेवर जेव्हा पहारा देतो तेव्हा एक जवान तासंतास एकाच ठिकाणी उभा राहून पहारा देत असतो. डोळ्याला दुर्बीण हातात बंदूक आणि आमचे लक्ष हे सतत सीमेवर असते कोणता शत्रू आपल्या सीमेमध्ये घुसपेट करतोय का या सर्व गोष्टी आम्हाला पहाव्या लागतात आणि जर असं कोणी आढळलं तर त्यावर तात्काळ आम्हाला हालचाल देखील करावी लागते.

सीमेच्या दुसरा बाजूला आमचा शत्रू आमच्या पुढे उभा जरी असला आम्हाला त्या शत्रूचा कितीही राग येत जरी असला तरी आम्ही त्याला काहीही करू शकत नाही या सर्व गोष्टींना आम्हाला सामोरे जावे लागते त्याचप्रमाणे सीमेवर झालेली प्रत्येक हालचाल आम्हाला नोंद करून घ्यावी लागते डोळ्यात तेल घालून आम्हाला आपल्या भारत मातेचे रक्षण करावे लागतात . या सर्व प्रसंगांना सामोरे जाऊन मी तुमचा साठी सीमेवर आपल्या या देशाचे रक्षण करत आहे.

एखाद्या दिवशी सीमेवर जास्त हालचाल दिसू लागली तर आम्हाला सर्वांना खूप कष्ट घ्यावे लागतात कधीकधी शत्रू चुकून आपल्या भूप्रदेशात आला आणि आपल्या देशातील नागरिकांना काही होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण मोठे सर्च ऑपरेशन करून त्या शत्रूला पकडण्याचे काम करतो आणि आपल्या भूप्रदेशाची संरक्षण करण्याचे देखील काम आम्ही सतत करत. आता मला परत किती दिवसानंतर घरी येण्याची परवानगी भेटल किती दिवसानंतर मला सुट्टी मिळेल आणि किती दिवस मिळेल याच विचारांमध्ये मी आत्ता सध्याला आहे आणि मी एवढेच बोलतो की आपण सर्वजण घरच्यांसोबत आहात आपल्या या देशांमध्ये आहात आम्ही सर्वजण तुमची रक्षा करत आहोत तुमचे देखील कर्तव्य आहे की तुम्ही आपल्या या भारत देशाला मोठे बनवावे भारत देशाचा विकास घडवून आणावा आणि देशांमध्ये आपुलकीने आणि एकजुटीने राहावे एवढे बोलूनच मी आज या ठिकाणी थांबतो.

मी सैनिक बोलतोय मराठी निबंध | mi sainik boltoy marathi madhe nibandh

Leave a Comment