मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध | Mi Shetkari Boltoy Marathi Niband

मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध | Mi Shetkari Boltoy Marathi Niband

मी शेतकरी बोलतोय निबंध : मित्रांनो आजच्या या लेखामध्ये मी शेतकरी बोलतो याबद्दल आपण निबंध लेखन करणार आहोत हे निबंध लेखन आपल्याला येणाऱ्या पेपर मध्ये खूप मदत करी होईल अशीच मी अपेक्षा करतो. आजच्या या आपल्या मी शेतकरी बोलतोय या निबंधाला सुरुवात करतो कारण हा निबंध आपण बारकाईने वाचणार आहोत आणि यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची मी आत्ताच खात्री करून देतो चला तर सुरुवात करूया आजच्या या मी शेतकरी बोलतोय या निबंधाला.

मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध | Mi Shetkari Boltoy Marathi Niband
मी शेतकरी बोलतोय मराठी निबंध | Mi Shetkari Boltoy Marathi Niband

शेतकर्‍याचे मनोगत / मी शेतकरी बोलतोय / शेतकऱ्याचे आत्मकथन

मी शेतकरी बोलतोय मी आज तुम्हाला खूप सार्‍या गोष्टी सांगणार आहे कारण या जगामध्ये शेतकरी म्हणजे काय हे लोक विसरत चालले आहेत तरीही मी आज तुम्हाला मी कोण आहे हे सांगणार आहे आज मी तुमच्याशी बोलणार आहे.

मित्रांनो मी एक शेतकरी आहेत मी दिवसभर रानामध्ये तुमच्यासाठी काम करत असतो तुम्हाला दररोज जे स्वादिष्ट अन्न येतं त्याला लागणाऱ्या भाजी आणि फळे यांची जबाबदारी मी घेतो दररोज तुम्हाला जे कडधान्य लागतं दररोज तुमच्या घरात जे दूध येतं त्याचप्रमाणे दररोज तुम्ही जे खातात ते पिकवण्याचे काम मी करत असतो तरीही देखील तुम्हाला मी काय करत आहे याची कधीही काळजी वाटत नाही.

मी सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत काम करत असतो शेताची काळजी घेत असतो शेतामध्ये लाभलेला भाजीपाला त्याला पाणी देण्याचे काम त्याला काढून विकण्याचे काम किंवा गायीची काळजी घेणं या सर्व गोष्टी मला पहाव्या लागतात मी एक लहान शेतकरी आहे या कारणाने माझ्याकडे कोणी जास्त लक्ष देत नाही शेतामध्ये पाण्याचा तुटवडा हा कायमच असतो त्याच पद्धतीने मी पिकवलेल्या भाज्यांना कधीच चांगला भाव मिळत नाही.

READ MORE  माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध | Majha avadta pakshi mor

मी जेव्हा माझ्या शेतातील फळे आणि भाजीपाला जेव्हा विकण्यासाठी जातो तेव्हा मला नीट जागा सुद्धा कोणी देत नाही आणि जागा दिली तर पैसे घेतात त्याच पद्धतीने मोठ्या सिटी मध्ये मोठ मोठे लोक माझ्याकडे येतात भाजीपाला घेत असताना माझ्याकडून मी सांगितलेल्या पैशांमधूनही अजून पैसे कमी करण्यात मला भाग पडतात त्यांच्यासाठी ते पाच रुपये दहा रुपये काही नसतात परंतु तेच पैसे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत हे त्यांना कधीच समजत नाही.

मी रात्रंदिवस कष्ट करून जे उगवतो त्याला मला कधीच चांगला भाव मिळत नाही ज्याच कारणाने महाराष्ट्रातील व या पूर्ण भारतातील शेतकरी हे गरीब राहिले आहेत मी मोठ्या शेतकऱ्यांचा विचार करत नाही मी माझ्यासारख्या लहान शेतकऱ्यांचा म्हणजेच कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांविषयी सांगत आहे.

याच कारणाने येत्या काळामध्ये कोणीही शेतीकडे बघत नाही शेती करणं असं बोललं की ते बोलतात नाही आम्ही नाही करणार ही शेती मग जर सगळेच असे बोलत असतील तर येत्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना जे जेवायला मिळतं ते कुठून मिळेल हा एक मोठा प्रश्न आहे याचा तुम्ही विचार केला का?

जर आम्ही भाजीपाला आणि फळे ही विकलीच नाही तर आम्हाला देखील पैसे मिळणार नाही आणि तुम्हाला तर खाण्यासाठी काही भेटणारच नाही परंतु आम्ही जेव्हा भाजीपाला विकण्यासाठी येतो तेव्हा आम्ही पैशाकडे न बघता आमच्या भाजीला किंवा फळांना तुमच्यापर्यंत देतो कारण त्याने तुमचे देखील पोट भरे आम्ही तुमचा विचार करतो मग तुम्ही का आमचा विचार करत नाही हे मला समजत नाही बरं.

READ MORE  पावसाळा मराठी निबंध | Marathi Nibandh on Rainy Season

मी आज तुमच्याशी बोलत आहे याचं कारण देखील तुम्हीच आहे कारण तुम्ही जर शेतकऱ्याचा विचार करत नसाल तर एक दिवस असा येईल त्या दिवशी भाजीपाल्याला खूप भाव वाढेल परंतु तो पिकवणारा कोणीही नसेल तुम्हाला जर वाटत असेल की शेती करणं सोपं आहे तर दहा दिवस तुम्ही एखाद्या शेतकऱ्याच्या घरी राहा आणि त्याच्याप्रमाणे काम करा तेव्हा तुम्हाला त्या भाजीची व फळाची किंमत समजेल एवढे बोलूनच मी आज थांबतो.

शेतकऱ्यांचे आत्मकथन निबंध मराठी | Atmakathan In Marathi

मित्रांनो आपल्याला मी शेतकरी बोलतो किंवा शेतकऱ्याचे आत्मकथा कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याच पद्धतीने आपण या लेखांमध्ये काय शिकला ते देखील आम्हाला सांगा तुमच्या मित्रपरिवारांशी देखील मी शेतकरी बोलतो हा निबंध नक्की शेअर करा.

Leave a comment