3+ माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Marathi Nibandh

माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Marathi Nibandh

माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Marathi Nibandh : आजी हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. आजीमुळेच आपल्या घरात सर्व गोष्टी ठीक चालू असतात. आजी ही सर्वांना हवीहवीशी वाटते. तिच्यामुळेच तर घराला शोभा येते. याच आजीबद्दल आज आपण निबंध बघणार आहोत.

तर आज मी तुमच्यासाठी मराठीमध्ये माझी आजी निबंध घेऊन आले आहे मी अपेक्षा करते की हा निबंध तुम्हाला खूपच उपयुक्त ठरेल आणि मी या निबंध मध्ये सर्व घटक किंवा सर्व गोष्टी क्रमानुसार मांडले आहेत जेणेकरून तुम्हाला हा निबंध वाचण्यात चांगला वाटेल किंवा तुम्हाला परीक्षेच्या वेळी यात जे मी पॉईंट्स दिले आहेत ते आठवायला मदत होईल. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Marathi Nibandh.

माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Marathi Nibandh
माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Marathi Nibandh

माझी आजी मराठी निबंध १०० शब्दात | Mazi Aaji Marathi Nibandh

आजी म्हणजे संस्कार ,संस्कृती जपणारी एक व्यक्ती आणि हीच व्यक्ती आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची असते आजी म्हणजे घरातील सौंदर्य असते आजीमुळेच आपल्यावर चांगले चांगले संस्कार होतात.आपल्यावर आधी संस्कार आपले आजी-आजोबा करतात आणि नंतर आपले आई-वडील करतात.

माझी आजी शिकलेली असल्याकारणाने ती माझा दररोज संध्याकाळी अभ्यास घेते आणि आजीमुळेच मला परीक्षेमध्ये देखील खूप चांगले गुण मिळतात. माझी आजी सकाळी लवकर उठते सर्वात अगोदर आंघोळ करते आणि आंघोळ झाल्यानंतर लगेचच देवपूजा करते माझ्या आजीला देवाचे स्मरण करायला खूप आवडते. माझ्या हळव्या मनाला समजून घेणारी जुन्या परंपरा माझ्यापर्यंत पोहोचवणारी अशी ही माझी आजी मला फार फार आवडते.

माझी आजी निबंध मराठी 10 ओळी | Mazi aaji essay in marathi 150 Words

आजी म्हणलं की आपल्या सर्वांना आठवते आजीच्या गोष्टी रात्री झोपताना आजी जसा आपल्याला थापडवते तस आपल्याला कोणीही झोपी लावू शकत नाही. माझी आजी खूप प्रेमळ दयाळू आणि शांत स्वभावाची आहे. ती कधीही माझ्यावर ओढत नाही किंवा मला मारत देखील नाही. माझ्या हातातून काही चूक झाली तर ती रागवण्याऐवजी मला प्रेमाने समजून सांगतो आजची नेहमी संध्याकाळी झोपताना मला महाभारतातल्या गोष्टी किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगते त्यातून आम्हाला भावंडांना चांगला बोध होईल.

आजी माझ्या आईची घर कामात खूप मदत करते. आजी शिकलेली असल्याकारणाने ती मला अभ्यासात देखील प्रचंड मदत करते. आणि आजी माझा दररोज संध्याकाळी अभ्यास घेते जेणेकरून मला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडतात.
आजी आम्हाला सर्वांना नेहमी तुझ्या बालपणीचे पिसे सांगत असते आणि त्यावेळी त्यांना दोन वेळेचं जेवण देखील मिळत नसायचं त्यामुळे आजी आम्हाला अन्नाचे महत्त्व समजून सांगते आणि जेवताना कधीही ताटात उष्ट ठेवायचं नाही असे देखील सांगते. आजी म्हणजे घरातील सौंदर्य असतं कुटुंबाला आपल्या नातवंडांना ती खूप प्रेम करत असते आणि आजीमुळेच आपल्याला चांगले संस्कार मिळतात त्याच्यामुळेच मला माझी आजी फार फार आवडते.

माझी आजी मराठी निबंध | My Grandmother Essay in Marathi ( २०० शब्दात )

माझी आजी म्हणजे आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ होय. आमच्या कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती तिच्या वागण्या बोलण्यात कमालीचा साधेपणा आहे. आजी सकाळी सर्वांच्या आधी आंघोळ करते आणि लगेचच देवपूजा करायला लागते माझ्या आजीला देवपूजा करायला फार फार आवडते. आजीची देवावर प्रचंड श्रद्धा आहे. आजी सर्व रिती संस्कृती पाळते. आजीला दुपारी झोपण्यापेक्षा टीव्हीवर सिरीयल बघायला खूप आवडते. जेव्हा मला आई ओरडते तेव्हा माझी आजी काय माझ्या बाजूने उभी असते.

आजी म्हणजे नातवंडांचा लाड करणारी व्यक्ती आणि नातवंडांची लाड पुरवत पुरवत आजीचे पूर्ण आयुष्य निघून जात. जगातील सर्व नातवंडांच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्यांची आजी कुणी हृदयाच्या सर्वात जवळ असेल तर ते म्हणजे आजी. जेव्हा मी शाळेतून घरी येते तेव्हा आल्या आल्या मला ती तोंड हात पाय धुवायला लावते आणि लगेचच काहीतरी खायला देते आणि त्यानंतर माझा अभ्यास घेते आणि आजीमुळेच मला परीक्षेमध्ये खूप छान गुण मिळतात.

ती आमच्यावर कधीही आवडत नाही परंतु ती आम्हाला अन्न वाया घालू देत नाही ती आम्हाला सांगते की ती जेव्हा लहान होती तेव्हा त्यांना दोन वेळचे खायला देखील भेटत नव्हतं त्यामुळे आजी कधीही अन्न वाया जाऊ देत नाही आणि कधीही जेवायच्या आधी श्लोक म्हणायचा असतो हे आम्हाला ते शिकवते. माझी आजी शिकलेली आहे त्यामुळे तिला वाचनाचा प्रचंड छंद आहे ती खूप सारी पुस्तके वाचते आणि त्या पुस्तकात तिने काय वाचले हे आम्हाला सांगते. नवीन पिढीतल्या स्त्रियांनाही लाजवेल इतकी माझी आजी धडधाकट आहे. अंशीच्या घरातील माझी आजी अजूनही उत्साहात वावरते. अशी ही माझी आजी मला खूप खूप आवडते.

माझी आजी मराठी निबंध ३०० शब्दात | My Grandmother Essay In Marathi

आईचे दुसरे रूप म्हणजे आजी. आजी म्हणजे आपली दुसरी आईच होय. किती सुंदर नातं असतं ना आजी आणि नातवंडांचं. सर्वच नातवंड रात्रीची वाट पाहत असता कारण की त्यांना त्या आजीच्या मांडीवर झोपून आजीने थापडवताना आजीच्या तोंडातून एक सुंदर जी गोष्ट ऐकायची चाहूल लागली असती किंवा आशा लागलेली असते.
आजीची गोष्ट म्हणजे स्वर्ग असतं.

आजीची गोष्ट ऐकताय तर कधी झोप लागून जाते समजत देखील नाही. आजीचा आणि नातवांचं नातं खूपच सुंदर असतं जे शब्दात देखील मांडता येणार नाही. आजी म्हणजे आपली खरी मैत्रीण असते जिच्या जवळ आपण आपल्या मनातील गुपित बोलून दाखवतो आजी म्हणजे एक सुखद प्रेमाचा झरा आहे आजी म्हणजे आपल्या लहानपणीची गोष्ट सांगणारी व्यक्ती आहे खरंच सर्वच आजी किती ग्रेट असतात ना !

आजीकडे किती गोष्टींचा संग्रह असतो दररोज नवीन नवीन गोष्ट आपल्याला ती सांगत असते. दररोज संध्याकाळी आजी आपल्या देवासमोर बसवते देवाचा दिवा लावायला लावते आणि शुभम करोति म्हणायला लावते आणि खरंच शुभम करोती म्हणून किती सुखद अनुभव भेटतो ना. जेव्हा आपण रात्री आजीच्या शेजारी झोपतो किंवा तिच्या मांडीवर झोपतो आणि आजी आपल्याला थापडवत असते ना त्या दिवशीची झोप लागते ना ती एक सुखद अनुभव असतो आयुष्यातला.
आजी आपल्याला आई समान असते रामायणातील महाभारतातील कथा आजी सर्वांनाच ऐकवत असते माझी आजी मी लहान असताना तिच्या हाताने घास भरवायची.

आजी सकाळी सर्वांच्या आधी उठते आंघोळ करते आणि लगेच देवपूजा करून घेते आजीला देवपूजा करायला खूप आवडते आणि आईची ची देवावर प्रचंड श्रद्धा आहे आणि देवपूजा झाल्यानंतरच ती कामाला हात लावते.आजी दररोज नवनवीन देवाच्या ओव्या आम्हाला शिकवत असते संध्याकाळी देवाला दिवा लावून श्लोक म्हणायला लावते दररोज आम्हाला वीर पुरुषांच्या गोष्टी सांगते. खरंच आजी म्हणजे प्रेमाचे प्रतीक असतं .आजी म्हणलं की कोणीतरी हक्काचं कुणीतरी असतं अगदी मनातलं अगदी आपल्या हृदयातलं कुणीतरी खास असतं.
खरंच आजी ही सर्व नातवंडांच्या आयुष्यातील एक अनमोल हिरा असतो.

माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Marathi Nibandh

विद्यार्थी मित्रांनो मी अशी अपेक्षा करते की हा माझी आजी मराठी निबंध | Mazi Aaji Marathi Nibandh तुम्हाला आवडला असेल आणि माझी आजी मराठी निबंध खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यामुळे तुम्ही हा निबंध एकदा नक्की वाचून जा हा निबंध जर तुम्ही वाचला ना तर तुम्हाला यातले थोडे जरी पॉईंट लक्षात राहिले तर तुम्ही पूर्ण गुण मिळू शकता फक्त तुम्हाला या छोट्या छोट्या पॉईंट्स लक्षात ठेवून त्यावर वाक्य बनवायचा आहे.

जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये पूर्ण वाक्य लक्षात ठेवून जायची गरज नाहीये छोट्या छोट्या पॉईंट्स लक्षात ठेवा आणि तिथे जाऊन वाक्य बनवा आणि मी नक्की तुम्हाला गॅरंटी देते की तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकता त्यामुळे चांगला अभ्यास करा आणि सर्वांना पेपर साठी शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद.

Leave a Comment