माझे घर मराठी निबंध | My Home Essay in Marathi

माझे घर मराठी निबंध | My Home Essay in Marathi

माझे घर मराठी निबंध : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या शालेय जीवनातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे निबंध लेखन अनेक वेळा शिक्षक देखील आपल्याला वर्गामध्ये निबंध लिहायला लावतात आणि विशेषतः परीक्षेमध्ये दहा ते पंधरा गुणांना निबंध विचारला जातो आणि पेपर म्हणजे दहावीचा आणि बारावीचा बोर्डाचा विषय आला तर शंभर टक्के दहा ते पंधरा गुणांना एक निबंध विचारला जातो. नेहमीसारखाच आजही आम्ही तुमच्यासाठी माझे घर मराठी निबंध घेऊन आलो आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला माझे घर मराठी निबंध

My House Essay in Marathi | माझे घर मराठी निबंध

घर म्हणजे आपुलकी जिव्हाळा आणि विश्वास .दिवसभर केलेली दर्द काम कष्ट या सर्वातून सुटका होण्यासाठी घर पुरेसे असते. नात्याच्या धाग्यात गुंफलेली जागा म्हणजे घर.

पक्षी जसा आपला पिल्लांना घरट्यातून उडवण्याची ज्ञान देतो त्याचप्रमाणे आई-वडील आपल्या मुलांना समाजात सुखाने कसे जगायचे किंवा कसं वापरायचं याबद्दल जिथे ज्ञान देतात किंवा जिथे मुलांना घडवतात ती जागा म्हणजे घर.

मला माझे चार खोल्या असलेले टुमदार घर खूप आवडते. त्यातील सर्व साधा सामान नीट करून ठेवलेलं मला फारच आवडतं आमच्या घरात प्रत्येक जण आपापली खोली व्यवस्थित ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळेच कुणालाही कामाचा त्रास होत नाही कारण स्वतःचे काम सर्वजण स्वतः करतात माझ्या घरात माझे आजी आजोबा आई बाबा दीदी मी आणि छोटा भाऊ असे सर्वजण राहतो आम्ही सर्वजण एकमेकांशी खूप प्रेमाने आणि खेळी मिळणे वागतो माझी आजी तर स्वयंपाकात सुगरण असल्याने आमच्या जीवनात दररोज निरनिराळ्या पदार्थांचा समावेश असतो.

READ MORE  माझा आवडता प्राणी कुत्रा मराठी निबंध | Majha Aavadta Prani Kutra Marathi Nibhand

आमच्या घराला आम्ही आनंद असं नाव दिलं आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घराची सर्वात महत्त्वाचे स्थान असते तसेच प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी घराची गरज असते म्हणून प्रत्येकाजवळ स्वतःचे घर असते. घर ही एक सर्वात सुंदर जागा आहे हक्काची जागा आहे घर छोटी असो व मोठी असो परंतु आपल्या घराला आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान असते जगामध्ये आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात फिरलो पण घरी येऊन राहण्याची चूक असतं ना ते जगाच्या कोपऱ्यात कुठेही नाही.

माझ्या घरात जास्त शोभेच्या वस्तू नाहीये परंतु माझ्या घरात खूप पुस्तक आहे आणि आम्हाला कुणालाही कधीही कंटाळा आला की आम्ही सर्वजण पुस्तके वाचतो माझ्या आईला देखील सर्व काम आवरल्यानंतर पुस्तके वाचायचा खूप छान आहे.

आम्ही आमच्या घरामध्ये कुंड्यांमध्ये काही रोपे लावले आहेत आणि आमच्या घराभोवतीही काही मोठी झाडे आहेत त्यामुळे छान सावली मिळते आणि आमच्या घराला शोभा येते आमच्या घरासमोर काही फुलांची झाडे देखील आहे जसं की गुलाब चमेली मोगरा जास्वंद अनेक प्रकारचे फुलांची झाडे आहे आणि त्या फुलांच्या वासांमुळे आमचे घर अत्यंत दरवळून जाते.

आम्ही घरासमोर दररोज रांगोळी काढतो जिने घराला शोभा येते आणि वातावरण प्रसन्न राहतो. घर म्हणजे नुसते छप्पर नसते तर ती त्या छपराने त्या कुटुंबावर घातलेली मायेची पाखर असते घर म्हणजे काही नुसत्याच भिंती नसतात तर त्यात राहणाऱ्या माणसांनी आपल्या स्वप्नांचे रंग त्या भिंतींना लावलेले असतात.

READ MORE  ‍ शेतकऱ्याची आत्मकथा निबंध | Shetkaryachi Atmakatha in Marathi

घरी संकल्पनाच माणसाला सुख देऊन जाते प्रत्येकाला दिवसभर काम करून घराची ओढ लागलेली असते आणि घरी आल्यावर जे सुख भेटते ते सुख कुठेच भेटत नाही कारण घरात आपली मायेची माणसं असतात.

आमच्या घराच्या खिडक्या मोठ्या मोठ्या आहेत जेणेकरून आम्हाला पंखी लावायची देखील किंवा एसी लावायची देखील गरज पडत नाही आणि घरात हवा खेळती राहते त्यामुळे वातावरण प्रसन्न राहते. मला माझं जास्त वेळ घरात घालवायला आवडतो.

आणि या सर्व गोष्टीमुळे मला माझे घर फार फार आवडते.

माझे घर मराठी निबंध | Marathi essay on my home in Marathi

विद्यार्थी मित्रांनो माझे घर मराठी निबंध मी पूर्णपणे सोप्या भाषेमध्ये ल तुम्हाला उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे मी अशी आशा करते की हा निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये खूप उपयुक्त ठरेल आणि हा जर निबंध तुम्ही वाचून गेला तर तुम्हाला शंभर टक्के पैकीच्या पैकी गुण परीक्षांमध्ये मिळते जर हा निबंध तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि या निबंधामध्ये जर तुम्हाला काही चुका आढळले असतील तर त्या देखील मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद

 

Leave a Comment