माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध | Majha avadta pakshi mor

माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध | Majha avadta pakshi mor

माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध : विद्यार्थी मित्रांनो माझा आवडता पक्षी या विषयावर अनेकदा निबंध विचारला जातो त्यामुळे मी हा निबंध तुमच्यासाठी घेऊन आले आहे आणि बहुतांश वेळा माझा आवडता पक्षी मोर याच विषयावर निबंध विचारला जातो कारण की मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध.

माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध| Majha avadta pakshi mor

माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध | my favourite bird peacock essay in Marathi

मोर हा पक्षी विविध रंगांनी नटलेला आहे मोराला जर आपण बघितले तर बघतच राहावे असे वाटते मोरामध्ये खूप सारे रंग सामावलेले आहे इतका सुंदर पक्षी आहे की बघावंच वाटतं नजरच हटत नाही.

मोराला बघताच मन अगदी आनंदित होतो आणि लहानपणीचे ते गाणं आठवतं “नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा रा नाच काळा काळा कापूस पिंजला रे ढगांशी वारा झुंजला रे आता तुझी पाळी मीच देते टाळी फुलो पिसारा नाच नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच” . किती ते सुंदर गाणं किती ते सुंदर वाक्य किती ते सुंदर शब्द या गाण्यांमध्ये आहेत खरंच लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा.

मोराच्या पिसांचा रंग आणि त्याच्या डोक्यावर असलेले ते तीन तुरे बघून कोणीही मोराच्या मोहात पडेल असा हा सुंदर पक्षी सर्वांनाच आवडतो जेव्हा मोर त्याचा पिसारा फुलवतो तेव्हा तर ते दृश्य बघण्याजोगे असते. पावसाळ्याच्या दिवसात मोर जेव्हा शेतांमध्ये पिसारा फुलवून डान्स करतो म्हणजेच नाचतो तेव्हा तर मोराकडे डोळ्याच्या पापण्या न मिटवता बघावंच वाटतं. मोराचा रंग मोराचे पिसारे मोराचे तुरे या सर्वांमुळे सर्वजण आपण त्याच्या मोहात पडतो.

READ MORE  मी मोबाईल बोलतोय मराठी निबंध | Mi Mobile Boltoy Marathi Nibandh

मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे आणि आधीपासूनच मोराचे एक अनन्यसाधारण स्थान आहे. आणि मोर या पक्षाची पूजा देखील केली जाते कारण मोर हा सरस्वती देवीचे वाहन आहे. आणि चित्रकार असो वा कवी या दोघांनाही मोर फार आवडतो. आणि तुम्ही म्हणता की हे कसं काय तर चित्रकार त्याच्या रंगांमध्ये मोर दाखवतो आणि कविताच्या कवितांमधनं मोरावरचे प्रेम दर्शवत असतो.

मोर जितका सुंदर आहे तितकाच शेतकऱ्याचा मित्र आहे. पिकांना नाचवणारे प्राणी म्हणजे साप उंदीर आणि बेडूक यांना मोर खाऊन टाकतो त्यामुळेच मोर हा शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो मोरामुळे शेतकऱ्याचे पीक चांगले येतात. जे प्राणी शेतकऱ्याला नुकसान पोहोचवतात त्या प्राण्यांनाच मोर खाऊन टाकतो त्यामुळे शेतकऱ्याचा आवडता मित्र म्हणजे मोर.

आणि मोराच्या एकाच कृत्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत असतात ते म्हणजे त्याचं नृत्य कारण पाऊस आला की मोर थुई थुई नाचतो आणि हेच बघण्यासाठी सर्वच लोक उत्सुक असतात.

मी जेव्हा जेव्हा मोराला बघते तेव्हा तेव्हा माझ्या शरीरात सकारात्मक ऊर्जा पसरते. कारण मोराच्या किती छोटा असतात ना किती विविध रंग त्याच्या अंगावर आहे तो कितीही दुःखी असला त्याला कितीही त्रास होत असला किंवा कधीही काही लागलेलं असेल शरीराला तरी देखील तो आपल्याला एक सकारात्मक शक्ती प्रदान करतो त्याच्या चालण्यासाठी त्याच्या डोलण्यासाठी त्याचे नृत्य बघण्यासाठी किंवा विशेषतः मोरालाच बघण्यासाठी आपण सर्व आतुरलेले असतो आणि आपल्या सर्वांना मोर खूप आवडतो त्याच्या छटा असतात त्या सर्वांनाच खूप आवडतात.

READ MORE  रस्त्याचे मनोगत मराठी निबंध | Rastyache Manogat Marathi Nibandh

आणि मोराच्या याच विविध गोष्टींमुळे मला मोर फार फार आवडतो.

माझा आवडता पक्षी मोर निबंध मराठी | Peacock Essay in Marathi

विद्यार्थी मित्रांनो माझा आवडता पक्षी मोर मराठी निबंध जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा निबंध पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये विचारला जातो त्यामुळे हा निबंध एकदा वाचून जा यातले मुद्दे तुम्ही फक्त समजून घ्या तुम्हाला हा निबंध पाठ करून जाण्याची काही आवश्यकता नाहीये तुम्ही फक्त मुद्दे वाचून जा तुम्हाला नक्कीच हा निबंध परीक्षेमध्ये आठ होईल.

हा निबंध तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देईल हे याची मी तुम्हाला आशा देते आणि या निबंध मध्ये जर तुम्हाला काही चुका वाटले असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्या चुका सुधारण्याचा माझ्या परीने प्रयत्न करेन आणि जर निबंध आवडला असेल तर मला नक्कीच कमेंट करा कारण तुमच्या कमेंट वाचून मला पुढील निबंध लिहायला प्रोत्साहन भेटतो आणि आपल्या वेबसाईटवर विविध प्रकारचे निबंध उपलब्ध आहेत ते देखील तुम्ही एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल.

धन्यवाद

Leave a Comment