माझे गाव मराठी निबंध| Majhe gaon Marathi nibandh

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझे गाव मराठी निबंध बघणार आहोत आणि हा निबंध खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जातो विशेषतः पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना हा निबंध विचारला जाऊ शकतो त्यामुळे मी हा निबंध तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि ते देखील मी सोप्या शब्दांचा वापर करून हा निबंध बनवला आहे जेणेकरून तुम्हाला हा निबंध वाचला तरी देखील लक्षात राहील चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला माझे गाव मराठी निबंध

माझे गाव मराठी निबंध| Majhe gaon Marathi nibandh

मला आता उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे मी मला ओढ लागली आहे ती म्हणजे आमच्या गावाची सुट्टीत मी नेहमीच गावाला जात असतो.

माझ्या गावाचे नाव लोणी आहे इथे माझ्या खूप साऱ्या आठवणी दडलेल्या आहेत. माझं गाव डोंगराच्या पायथ्याशी आहे आणि माझ्या गावात पूर्णपणे हिरवळ पसरलेली आहे माझं गाव निसर्गाने नटलेला आहे. माझगाव छोटसं गाव आहे परंतु तिथे राहणारा माणूस कधीच दुखी राहू शकत नाही.

माझ्या गावांमध्ये सुख समृद्धी आनंद सर्वच गोष्टी भेटू शकतात असं गाव आहे लांबपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हिरवगार असं रान दिसतो. गावाकडे गेल्यावर शेळी मेंढी गाय म्हैस बैल अशा अनेक प्रकारच्या पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवायला भेटतो. कधी कधी गावात गेल्यावर वाघ देखील दिसतो आणि आमच्या गावामध्ये वाघांनी खूप धुमाकूळ घातलेला आहे कारण माझं गाव डोंगराच्या पायथ्याशी बसलेला आहे आणि जंगलांमुळे तिथे वाघांचा वावर जास्त असतो.

आमच्या गावी कोंबड्या देखील पाळल्या जातात आणि त्या कोंबड्यांमध्ये मला पळायला तुला गाणे टाकायला प्रचंड आवडतं. इथे शहरांमध्ये खेळायचं म्हणलं की ग्राउंड शोधावं लागतं परंतु गावामध्ये असे काहीच नसतं गावामध्ये जिकडे पहावे तिकडे जागा असते आणि खेळण्यासाठी तर जागाच जागा असते.

आमच्या गावामध्ये प्रत्येक सण मिळून मिसळून साजरा केला जातो. गावामध्ये सर्वजण एकत्र येऊन सर्व सण साजरे करतात. आमच्या गावात एक गाव एक गणपती अशी प्रथा आहे. दिवाळीला देखील सर्वजण एकत्र येऊन हा सण साजरा करतात अशा विविध प्रकारचे सण येथे एकत्र मिळून साजरे केले जातात.

गावातील लोक खूप एकजुटीने राहतात आपण म्हणतो की शहरातील लोक एकमेकांना ओळख देत नाही परंतु गावा त्याच्या पूर्णपणे उलटी परिस्थिती असते गावांमध्ये सर्व लोक अनोळखी किंवा ओळखीच्या लोकांसोबत प्रेमाने आणि आपुलकीने वागतात. गावामध्ये अतिथी देवो भव असं मानलं जातं.

गावामध्ये शहरासारख्या सर्व लोकांकडे बिल्डिंग नसतात छोटीशी घरी असतात छपराची घरी असतात परंतु त्यात सर्वांना आनंद असतो आणि कुणालाही येथे बंगला बांधायची हाऊस नाहीये जी आहे त्यात सर्व गावकरी सुखी आहे. गावामध्ये खूप सार्‍या गोष्टी पाळल्या जातात जसं की सर्वांनी बैलपोळ्याला एकत्र पोळा साजरा करायचा गणपती मध्ये सर्वांनी एकत्र जेवण करायचे दिवाळीला एकमेकांना फराळ वाटायचा किंवा अशा अनेक गोष्टी पाहायला जातात.

सर्वच गावकरी छोटा ना छोटा व्यवसाय करतात जसे की कुक्कुटपालन दुधाचा व्यवसाय किंवा असे अनेक व्यवसाय गावकरी करतात. आणि स्वतःचा उदरनिर्वाह करतात

असं हे आमचे छोटेसे गाव डोंगराच्या पायथ्याशी बसलेलं मला फार फार आवडतं.

माझे गाव मराठी निबंध| Majhe gaon Marathi nibandh

विद्यार्थी मित्रांनो माझं गाव मराठी निबंध जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा आणि निबंध लिहिताना माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर त्या देखील मला कळवा मी माझ्या चुका सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन . आणि मला कमेंट मध्ये नक्की कळवा की तुमच्या गावाचं नाव काय आहे आणि तुम्हाला तुमचं गाव किती आवडतं आणि तुम्ही तुमच्या गावाकडे वर्षातून किती वेळा जातात.

Leave a Comment