अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी । Akasmat Padlela Paus Essay in Marathi

अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी । Akasmat Padlela Paus Essay in Marathi

अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी : विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन लेखांमध्ये आपण सर्वजण अकस्मात पडलेला पाऊस या विषयावर निबंध लेखन करणार आहोत पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि आपल्या घरा जवळ अचानक पाऊस पडतो याच पावसाचे आपल्याला आजच्या या लेखांमध्ये वर्णन करायचे आहे. जेणेकरून आपल्या सर्वांना अकस्मात पडलेला पाऊस यावर निबंध लिहिता येईल चला तर सुरुवात करूया आजच्या या निबंध लेखनाच्या नवीन विषय सोबत आणि जाणून घेऊया अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध.

Akasmat Padlela Paus Essay in Marathi
Akasmat Padlela Paus Essay in Marathi

अकस्मात पडलेला पाऊस निबंध लेखन मराठी

निबंध 1

उन्हाळ्याचा दिवस आहे घरामध्ये खूप गरम होत आहे आणि मी घामाने कोला चिंब झालेलो आहे कारण खोलीमध्ये खूप दमट वातावरण तयार झालं आणि असं दमट वातावरण झालं की आम्ही सर्वजण समजून घेतो की आता पाऊस येणार.

असा विचार केल्या केल्या घरामध्ये गार वारा येऊ लागला असा वारा हा पाऊस आपल्या घराजवळ आल्यावरच येतो हे देखील मला माहीत होते म्हणून मी खूप आनंदी झालो आणि पाऊस येण्याची वाट बघत बसलो मी खोलीमधून बाहेर गेल्यानंतर झाडे खूप जोरजोरात हलत होती वारा खूप जोरात चालू होता आणि या सर्व गोष्टी होत असताना देखील मी घराबाहेर पडलो आणि पावसाचा आनंद घ्यायचा पावसामध्ये ओले चिंब व्हायचे अशा विचाराने मी बाहेर जाऊन उभे राहिलो. बघता बघताच वातावरण अचानक बदलले आणि खूप जोरदार पाऊस सुरू झाला.

मला पहिल्यांदा वाटलं होतं की पाऊस थोडा असेल आपण या पावसाची मजा घेऊया परंतु तसं काही नव्हतं पाऊस खूप जोरात येऊ लागला त्या पावसामध्ये गारा देखील पडू लागल्या मग आम्ही सर्वजण घरात आलो. तेवढ्यात माझं लक्ष एका झाडाकडे गेलं त्या झाडावर एक माकड बसलेलं होतं त्या माकडाला गाराचा मार लागत होता हे माझ्या लक्षात आलं मग आम्ही सर्वजण पूर्ण घरामध्ये गेलो मग ते माकड आमच्या घराशेजारच्या शेडमध्ये येऊन थांबले मग आम्हाला सर्वांना खूप चांगलं वाटलं.

पाऊस थोडासा कमी झाला आम्ही सर्वजण परत बाहेर निघालो पावसामध्ये खूप खेळलो एकमेकांची मज्जा घेतली आणि आम्ही सर्वांनी मज्जा देखील खूप केली. पाऊस येण्याअगोदर खूप गरम होत होते परंतु त्यानंतर खूप मस्त वातावरण तयार झाले. पावसामध्ये आम्हाला सर्वांना इंद्रधनुष्य देखील पाहायला मिळाला आम्ही इंद्रधनुष्याच्या सात रंगांमध्ये इतकं मग्न होऊन गेलो की पाऊस किती चालू आहे याचे भान सुद्धा राहिली नाही. पावसा अगोदर झाड सुकलेली होती झाडांची पालवी सुरकटलेली होती त्याचप्रमाणे झाडांवर खूप धूळ देखील लागलेली होती परंतु पाऊस झाल्यानंतर झाडे देखील टवटवीत झाली झाडे हिरवीगार दिसू लागले आणि झाडांवरची धुळ देखील निघून गेली म्हणून सगळीकडचा वातावरण हे प्रसन्न झाले हा असा आहे माझा अचानक पाऊस पडलेला याचा प्रसंग.

अचानक पडलेला पाऊस निबंध मराठी – Akasmat Padlela Paus Essay in Marathi

निबंध – 2

पावसाळ्याचे दिवस चालू झाले आणि तरी देखील पाऊस पडेना असं झालं सर्व शेतकरी पावसाची वाट बघत ढगांकडे बघत बसले तरीदेखील पाऊस होईना उन्हाळ्यामध्ये सगळीकडे सर्व झाडे सुरकुटून गेलेली सर्व गवत जळून गेलेले आणि सगळीकडे पाण्याचा तुटवडा होत आहे तरी देखील पाऊस होत नाही हे दृश्य खूप भयंकर आहेत आमच्याकडे एक वर्षापासून दुष्काळ आहे.

या सर्व गोष्टी होत असताना वातावरण अचानक बदलले जोराचा वारा सुरू झाला ढग एका बाजूने दुसऱ्या बाजूला जोरात वाहू लागले आणि वाऱ्यासोबत गार हवा देखील येऊ लागली याचा अर्थ एकच होता की आता लवकरच पाऊस येणार आम्ही सर्वजण खूप आनंदीच आलो आणि पावसाची वाट बघू लागलो कारण आमच्या गावांमध्ये खूप भयंकर असा दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळातून बाहेर निघणं म्हणजेच खूप चांगला असा पाऊस होणे हेच एक याची उत्तर होते.

विजा चमकु लागल्या वारा देखील खूप जोरात चालू होता आणि या सर्व गोष्टी होत असतानाच पाऊस पण खूप जोरात आला पाऊस आल्यानंतर आम्हाला पावसाचा आनंद घेताच आला नाही कारण की पाऊस आल्या आल्या इतका जोरात होता की आम्हाला बाहेर काय चालू आहेत हे सुद्धा दिसत नव्हतं आणि विजा चमकत होत्या म्हणून आम्हाला बाहेर जाता येत नव्हतं.

या सर्व गोष्टी होत असताना घरातील सर्व सदस्य आणि मी देखील खूप आनंदी होतो आणि मी विचार करत होतो की आमच्या शेतात पाण्याची खूप गरज होते आता शेतामध्ये चांगलं पाणी बसलेलं असेल आणि हाच विचार करता करता घरच्यांसोबत गप्पा मारता मारता एक तास कसा निघून गेला हेच समजलं नाही त्यानंतर पाऊस थोडासा कमी झाला आणि आम्ही सर्वजण बाहेर निघालो.

माझ्या घरा शेजारचे माझे मित्र देखील बाहेर आले आम्ही सर्वजण पावसाचा खूप आनंद घेतला पावसामध्ये खूप खेळलो आणि त्याच प्रमाणे पावसामुळे झालेले बदल हे देखील आमच्या सर्वांच्या लक्षात आले तेव्हा आम्हाला समजलं की पाऊस किती महत्त्वाचा असतो पाणी किती महत्त्वाचे असते पाण्याचा आपण नीट वापर केला पाहिजे जेणेकरून पाऊस लवकर झाला नाही.

तर आपण त्याच पाण्याचा उपयोग करू शकतो या सर्व गोष्टी समजल्यानंतर आम्ही शेताकडे गेलो शेतामध्ये पाणी कसं वाहत आहे हे सर्व पाहिलं हे पाहून आम्हाला सर्वांना खूप आनंद झाला आणि हेच दृश्य बघत असताना डोंगराच्या कडेला इंद्रधनुष्य निघाला आणि इंद्रधनुष्याकडे लक्ष माझ्या मित्राचे गेले त्यांनी आम्हाला सर्वांना इंद्रधनुष्य पाहायला लावले आम्ही सर्वांनी इंद्रधनुष्य पाहिला आम्हाला इंद्रधनुष्य पाहून खूप आनंद झाला इंद्रधनुष्याला पाहून आम्हाला चार ते पाच वर्ष झाले असतील तेव्हापासून आम्ही इंद्रधनुष्याला पाहिलं नव्हतं आम्ही खूप सारे फोटो घेतले व्हिडिओ बनवले आणि घराकडे निघालो.

घराकडे येत असताना आम्ही पाऊस झाल्यानंतर चे खूप सारे बदल अनुभवले त्यामध्ये प्रमुख म्हणजे झाडे पहिल्यांदा सुरकटलेली होती परंतु आता झाडे टवटवीत झाली आहे हिरवीगार झालेली आहेत हे आमच्या लक्षात आले त्यानंतर रस्त्याच्या कडाची धूळ आणि झाडांवरची धूळ ही सर्व धुवून गेली सर्व झाडे चकचक करत होते खूप चांगली दिसत होते हे आमच्या लक्षात आले तसेच आमच्या शेतामध्ये पाणी साचलेले पाहून आम्हाला खूप आनंद देखील झाला आणि पाऊस आल्या आल्या जो मातीचा सुगंध येतो तो सुगंध आपल्याला या जगात कुठेही अनुभवायला मिळणार नाही असा हा अनुभव आम्ही घेतला असा आहे माझा अचानक पडलेला पावसाचा अनुभव.

अकस्मात पडलेला पाऊस मराठी निबंध | Aksmat padlela Paus Essay in Marathi

मित्रांनो वरील अचानक पडलेला पाऊस मराठी निबंध किंवा अकस्मात पडलेला पाऊस हा निबंध आपल्याला सर्वांना कसा वाटला आम्हाला नक्की कळवा त्याचप्रमाणे आपल्याला मराठीमधील इतर कोणत्याही प्रकारची निबंध लागत असतील तरी देखील आपण आम्हाला कमेंट करू शकता आम्ही तुमच्या कमेंट सांग नक्की रिप्लाय देऊया आणि आपल्याला हवे ते निबंध देण्याचा प्रयत्न करूया त्याच पद्धतीने आपल्याकडे देखील कोणत्याही प्रकारचे निबंध असतील ते देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या निबंधाची मदत होईल आम्ही तुमचे निबंध हे नक्की आमच्या वेबसाईटवर टाकण्याचा प्रयत्न करूया एवढे बोलूनच आज मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद.

Leave a Comment