माझा आवडता छंद चित्रकला निबंध | Essay On Drawing in Marathi

माझा आवडता छंद चित्रकला निबंध | Essay On Drawing in Marathi

विद्यार्थी मित्रांनो आजच्या या निबंध मध्ये आपण माझा आवडता छंद चित्रकला हा निबंध बघणार आहोत आणि हा निबंध खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला.

माझा आवडता छंद चित्रकला निबंध | Essay On Drawing in Marathi
माझा आवडता छंद चित्रकला निबंध | Essay On Drawing in Marathi

चित्रकला मराठी निबंध | Chitrakala Marathi Nibandh.

मला बालपणापासून चित्र काढायची प्रचंड आवड होती. मी लहानपणी लेखी माझ्या चित्रकलेचे वहीमध्ये खूप सारे चित्र काढायचे मला दुसऱ्या कुठल्या विषयांपेक्षा चित्रकला हा विषय फार आवडायचा. मी घरात देखील भिंतीवर खूप वेळा चित्र काढायचे आणि यामुळे बोलणे देखील खायचे.

परंतु चित्रकला हा विषय माझा फार प्रिय होता हळूह ळू मी स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेऊ लागले प्रथमता मला कुठेही काहीच बक्षीस भेटले नाही कारण मला जास्त ज्ञान नव्हतं. परंतु हळूहळू मी सराव करत गेले आणि मला चित्र काढणे येऊ लागले. आमच्या शाळेच्या भिंतीवर खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्टूनचे आणि अनेक प्रकारचे चित्र काढलेले असायचे मला ते चित्र पाहून असं वाटायचं की मला देखील हे चित्र काढता येतील की नाही परंतु मी खूप वेळा तसेच चित्र काढायचा प्रयत्न करायचे. आणि असेच हळूहळू प्रयत्न करत करत मला देखील छान चित्र काढता यायला लागलं.

मी जिल्हास्तरीय चित्रकलेच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आमचे चित्रकलेचे सर देखील फार छान प्रकारे आम्हाला चित्रकला शिकवायचे चित्रकलेमध्ये विशेषता दोन प्रकार पडतात रेखाटन आणि रंगकला तरी या दोन्हीही जर आपल्याला जमल्या तरीही आपला आयुष्य सुखकर होऊन जातं. चित्रकला म्हणजे केवळ चित्र काढणे नाही तर आपल्या मनातील भावना कागदावर चित्राच्या सहाय्याने काढणं म्हणजे चित्रकला होय.

मी आमच्या घरामध्ये प्रत्येक भिंतीवर कागदावर काढलेले चित्र चिटकवलेले आहेत मला खूप गोष्टी रंगवायला आवडतात आणि आमच्या शाळेमध्ये दरवर्षी चित्रकला ची स्पर्धा होते त्यामध्ये मी नेहमीच भाग घेत असतो. आमचे चित्रकलेचे सर देखील अनेक परीक्षण मध्ये माझं नाव देतात. आणि ते मला कुठे दुसऱ्या गावात जर चित्रकलेची परीक्षा असेल तर तेथे देखील घेऊन जातात. आता मी चित्रकलेमध्ये खूप प्रगती केली आहे मला हुबेहूब चित्र काढता येतात.

चित्रकला शिकण्यासाठी बारीक निरीक्षणाची गरज असते चित्रकला शिकणे इतके सोपे काम नव्हे. काही दिवसांपूर्वी मला माझे बाबा चित्र प्रदर्शन बघायला घेऊन गेले होते तेथे मी अनेक प्रकारचे चित्र बघितले आणि त्यातून मला अनेक प्रकारच्या नवनवीन गोष्टी शिकायला भेटल्यात तो क्षण माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता. आणि त्या दिवशीपासून मी एक स्वप्न बघतो की त्या चित्र प्रदर्शनामध्ये एक दिवस माझे देखील चित्र असेल.

माझी आवडती कला चित्रकला निबंध | Essay on My Favourite Hobby Drawing in Marathi

विद्यार्थी मित्रांनो वरील निबंध जर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा परीक्षेमध्ये अनेक वेळा माझा आवडता छंद चित्रकला हा निबंध विचारला जाऊ शकतो कारण सर्वांचाच आवडता विषय चित्रकला हा असतो त्यामुळे हा निबंध एकदा वाचून जा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये मदत होईल आणि आपल्या वेबसाईटवर मी अनेक प्रकारचे निबंध टाकलेले आहेत ते देखील एकदा नक्की बघा त्यापैकी देखील एखाद्या निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. धन्यवाद

Leave a Comment