मकर संक्रांत मराठी निबंध | Makar Sankranti Essay in Marathi

मकर संक्रांत मराठी निबंध | Makar Sankranti Essay in Marathi

मकर संक्रांत मराठी निबंध – Makar Sankranti Essay in Marathi : विद्यार्थी मित्रांनो मकर संक्रांत हा सण आपल्या भारतामध्ये खूप धुमधडाक्यात साजरा केला जातो आणि हा एक मुख्य सण मानला जातो त्यामुळे आज आपण याच मकर संक्रांत विषयी मराठी निबंध बघणार आहोत कारण हा निबंध खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला मकर संक्रांत मराठी निबंध.

मकर संक्रांत मराठी निबंध | Makar Sankranti Essay in Marathi
मकर संक्रांत मराठी निबंध | Makar Sankranti Essay in Marathi

मकरसंक्रांत निबंध मराठी | Makar Sankranti Essay in Marathi

मकर संक्रांत हा सण भारतातील मुख्य सणांपैकी एक सण मानला जातो. हा सण भारतामध्ये प्रचंड धुमधडाक्यात साजरा केला जातो. मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यात येतो परंतु हा सण नेहमीच 14 किंवा 15 तारखेला येतो. मकर संक्रांतीच्या संबंध पृथ्वीच्या आणि सूर्याच्या स्थिती संबंधित असतो. ज्यावेळेस सूर्य मकर रेखेवर येतो त्यावेळेस आपण मकर संक्रांत साजरी करतो आणि शक्यतो हे 14 किंवा 15 जानेवारीला होते.

भारतात मकर संक्रांत विविध राज्यांमध्ये विविध पद्धतीने साजरी केली जाते. महाराष्ट्रात आपण मकर संक्रांतीला मकर संक्रांति असे म्हणतो. तमिळनाडूमध्ये याच मकर संक्रांतीला पोंगल असे म्हटले जाते. पंजाब आणि हरियाणा मध्ये या दिवशी नवीन पिकाचे स्वागत केले जाते आणि यालाच लोहडी असे म्हटले जाते. केरळ कर्नाटकामध्ये याला संक्रांती असे म्हटले जाते.

नाव काहीही असो पण सर एकच मकर संक्रांति. परंतु वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळी पद्धत साजरी केली जाते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे व्यंजन म्हणून मकर संक्रांतीचे स्वागत केलं जातं आणि प्रत्येक राज्यानुसार त्यांची त्यांची ती वेगळी पद्धत असते हे मकर संक्रांत सादर करायला. मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटे लवकर उठून उठण्याने आंघोळ करायची पद्धत आहे त्यानंतर तिळगुळाचे लाडू बनवून ते सर्वांना वाटण्याची पद्धत आहे आणि त्यानंतर पतंग उडवण्याची पद्धत देखील राजस्थान आणि गुजरात मध्ये जास्त प्रमाणात बघायला मिळते.

READ MORE  झाडाची आत्मकथा निबंध मराठी | Mi Zad Boltoy Nibandh Marathi

मकर संक्रांति मध्ये तीळ आणि गुळाला जास्त महत्त्व आहे याचे देखील एक कारण आहे ते म्हणजे मकर संक्रांत ही थंडीच्या दिवसात येते आणि गुळ आणि तीळ खाऊन आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते यामुळे मकर संक्रांतीच्या वेळेला तीळ आणि गुळ खाल्ले जातात. आणि या सर्व गोष्टींमुळे आपण सर्वांना मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळ वाटतो जेणेकरून सर्वांचा स्वास्थ निरोगी राहतं आणि थंडीच्या काळामध्ये सर्वांनाच उष्णता मिळवण्यास मदत होते.

शेतकऱ्यांसाठी मकर संक्रांत हा सण खूप महत्त्वाचा असतो कारण याच वेळेला शेतातील पिके कापले जातात. आणि मकर संक्रांतीला मकर संक्रांत असे नाव पडले कारण या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. मकर संक्रांति नंतर दिवस मोठा होत जातो आणि रात्र छोटी होत जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व लहान मुले त्यांच्या आई-वडिलांचा वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतात आणि एकमेकांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला अशा शुभेच्छा देऊन तिळगुळाचे देवाण-घेवाण करतात.

आणि आपण मकर संक्रांतीला पतंग उडवतो यामागे देखील एक कारण आहे आपल्या प्रत्येक मराठी सणांमध्ये काहीतरी विशेष कारण दडून बसलेला आहे जसे की मकर संक्रांतीला तिळगुळ खातात कारण की तिळगुळाने शरीरातील उष्णता वाढते कारण मकर संक्रांत हा थंडीच्या दिवसांमध्ये येणार असं नाही त्याचप्रमाणे या वेळेस पतंग उडवले जातात यामागे देखील एक कारण आहे. थंडीच्या दिवसांमध्ये पतंग उडवून सूर्याकडून आपल्याला डी जीवनसत्व प्राप्त होते ज्यामुळे आपल्या अंगातील उष्णता वाढते आणि आपल्याला थंडी वाजत नाही. आणि आपण अनेक समस्यांपासून दूर होऊन निरोगी राहतो.

READ MORE  अकस्मात पडलेला पाऊस निबंध मराठी । Akasmat Padlela Paus Essay in Marathi

अशाप्रकारे सर्व मकर संक्रांतीचे महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या दिवशी एकमेकांशी गोड गोड बोलू असा निश्चय करून हा सण साजरा केला जातो.

Makar Sankranti Essay In Marathi | मकर संक्रांति वर मराठी निबंध

विद्यार्थी मित्रांनो जर हा तुम्हाला निबंध आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि या निबंधामध्ये जर काही चुका तुम्हाला आढळून आले असतील तर त्या देखील मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी माझ्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करेन त्याचप्रमाणे आपल्या वेबसाईटवर अनेक विविध प्रकारचे निबंध लेखन मी तुमच्यासाठी उपलब्ध करून दिली आहे ते देखील एकदा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये निबंध लिहिण्यास मदत होईल.

Leave a comment