माझी सहल मराठी निबंध मराठी । Mazi Sahal Marathi Nibhand

माझी सहल मराठी निबंध मराठी । Mazi Sahal Essay in Marathi

माझी सहल मराठी निबंध मराठी  : विद्यार्थी मित्रांनो आज आपण माझी सहल या विषयावर निबंध बघणार आहोत माझी सहल हा निबंध खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा निबंध तुम्ही एकदा वाचलात तर तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या निबंधाला माझी सहल मराठी निबंध.

माझी सहल मराठी निबंध मराठी । Mazi Sahal Marathi Nibhand
माझी सहल मराठी निबंध मराठी । Mazi Sahal Marathi Nibhand

Mazi Sahal Marathi Nibandh l आमची सहल निबंध

आमची सहल डिसेंबर महिन्यात जाणार होती. सहलीसाठी ठिकाण निवडलेले होते परंतु कितवी चा वर्ग कुठे सहलीला जाणार हे ठरवलेलं नव्हतं. पाचवी ते दहावीचे सर्व वर्ग सहलीला जाणार होते. भंडारदरा ,शिर्डी, औरंगाबाद ,नाशिक पुणे, मुळा धरण अशी अनेक ठिकाणी ठरली होती. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना जवळच्या ठिकाणी नेण्यात येणार होतो आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना लांबच्या ठिकाणी नेण्यात येणार होतो.

सर्वांनाच उत्सुकता होती की आपली सहल कुठे जाणार आहे. मी सहावीच्या वर्गातील विद्यार्थिनी होते त्यामुळे आमच्या वर्गासाठी शिर्डी हे ठिकाण ठरले होते. आमचं ठिकाण ठरल्यानंतर सर्वांची लगबग सुरू झाली. सर्वजण तयारी करायला लागले शेवटी सहलीची तारीख 25 डिसेंबर ही ठरली.

आम्हा विद्यार्थ्यांसाठी आधीच सूचना पत्रक आलेले होते. कुणालाही मोबाईल सोबत ठेवण्यास परवानगी नव्हती त्यामुळे कुठेही आम्हाला फोटो काढता येणार नव्हते. परंतु मित्र मैत्रिणी सोबत फिरायला जाणार याची उत्सुकता लागली होती.

READ MORE  पावसाळा मराठी निबंध | Marathi Nibandh on Rainy Season

आमची बस सकाळी पाच वाजता निघणार होती. मी पहाटे तीनला उठून आवरायला लागले कारण मला सहलीला जाण्यासाठी खूप उत्सुकता लागली होती. मी माझं सर्व सामान खूप वेळा चेक करत होते मी सर्व काही घेतला आहे की नाही. माझं सर्व आवरल्यावर मी शाळेमध्ये गेले आमच्या शाळेसमोर आमची बस उभी राहिलेली होती. आम्हाला बस इथून पाच वाजता निघणार असं सांगितलं होतं परंतु सहा वाजले तरीही बस निघालेली नव्हती.

आमची बस शाळेतून साडेसहा वाजता निघाली आम्हाला जाता जाता एका ठिकाणी चहा देण्यात आला. त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. आम्हाला पहिल्यांदी शिर्डीच्या पक्षी संग्रहालयात नेण्यात आली तेथे विविध प्रकारचे पक्षी उपलब्ध होते विविध रंगाने नटलेले पक्षी तिथे उपलब्ध होते तिथे माशांचा देखील एक संग्रहालय होतं तिथे विविध प्रकारचे मासे माशांच्या काचेच्या टॅंक मध्ये होते.

आम्ही खूप साऱ्या गोष्टी तिथे बघितल्या त्यानंतर आम्हाला शिर्डीच्या भोजनालयात नेण्यात आले. तेथे फुकट जेवण भेटते तिथे वरण-भात एक भाजी आणि पोळी असं जेवण होतं ते आम्ही पोट भरून खाल्लं त्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या शाळेच्या बसमध्ये येऊन बसलो आमच्या शिक्षकांनी सर्व मुले आहेत की नाही ते एकदा तपासून बघितले आणि मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला.

आम्हाला शिर्डीच्या वॉटर पार्क मध्ये नेण्यात आले तिथे आम्ही गेल्यावर आमचे तिकीट काढण्यात आले आणि मग आम्हाला आज सोडण्यात आले परंतु तेथे आपले कपडे घालून आज जाण्यास परवानगी नव्हती त्यामुळे त्यांनी दिलेले कपडे घालून आम्ही सर्व विद्यार्थी आत गेलो त्यानंतर तेथे आम्ही खूप मज्जा केली आम्ही सुमारे दोन वाजता वॉटर पार्क मध्ये गेलो होतो तर आम्ही पाच वाजेच्या सुमारास बाहेर आलो.

READ MORE  माझे घर मराठी निबंध | My Home Essay in Marathi

वॉटर पार्क मध्ये विविध प्रकारच्या घसरगुंडी झोका अशा अनेक प्रकारचे खेळ उपलब्ध होते आणि शिर्डीचे वॉटर पार्क प्रचंड मोठं आहे. पाच वाजल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मग आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आम्ही सुमारे साडे सात ते आठच्या दरम्यान आमच्या शाळेपर्यंत आलो होतो. आणि ही आमची शिर्डीची सहल नेहमीच आमच्या आठवणीत राहील.

माझी सहल मराठी निबंध मराठी मध्ये । Mazi Sahal Essay in Marathi

विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला निबंध आवडला असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुमची सहल कुठे गेले होते हे देखील मला कमेंट मध्ये सांगा आम्ही आमच्या वेबसाईटवर तुमच्यासाठी विविध प्रकारचे निबंध उपलब्ध करून दिलेले आहे ते देखील एकदा नक्की बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये मदत होईल धन्यवाद.

Leave a Comment