माझे घर मराठी निबंध | Essay on My House in Marathi

माझे घर मराठी निबंध | Essay on My House in Marathi

माझे घर मराठी निबंध : मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण सर्वजण माझे घर मराठी निबंध यावर चर्चा करणार आहोत यामध्ये आपण माझे घर मराठी निबंध कसा लिहिला पाहिजे हे देखील बघणार आहोत जेणेकरून आपण हा निबंध लिहिल्यानंतर आपल्याला मनाने देखील निबंध लिहिण्यास मदत होईल.

कारण निबंध हा आपल्याला मनानेच लिहावा लागतो परंतु आपण रेफरन्स किंवा इतर निबंध वाचून त्या निबंधामध्ये कसं लिहिलेलं आहे त्या निबंधामध्ये कशी माहिती दाखवली आहेत यांचाच उपयोग करून आपण आपल्या मनाचा निबंध बनवीत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या या नवीन निबंधाला आणि पाहूया माझे घर मराठी निबंध.

माझे घर मराठी निबंध | Essay on My House in Marathi
माझे घर मराठी निबंध | Essay on My House in Marathi

माझे घर मराठी निबंध | Majhe Ghar Marathi Nibandh

मी एका गावामध्ये राहतो म्हणून माझे घर एका गावामध्ये आहेत गावामध्ये घर म्हणलं की आपल्या सर्वांच्या लगेच लक्षात येतं की घरापुढे मोठं अंगण असेल जास्त जागा असेल त्यानंतर घराच्या कडेला खूप सारी झाडे असतील घर खूप मोठे असल घराच्या अवतीभवती खूप चांगलं असं वातावरण असेल आणि खूप साऱ्या गोष्टी या आपल्या लगेच डोळ्यासमोर येतं असंच काही माझं घर देखील आहे.

माझ्या घरात एकूण पाच खोल्या आहेत आणि घर मधून खूप चांगला आहेत जेणेकरून आम्हाला सर्वांना घर खूप आवडतं घरामध्ये सर्व प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध आहेत म्हणजेच आपल्याला जे दररोज काम करायचे असते ते गोष्टी आम्ही सर्व मशीन द्वारे करून घेतो. घराच्या समोर खूप मोठे अंगण आहेत अंगणामध्ये एक बॅडमिंटन खेळण्यासाठी जागा देखील आहे त्याचप्रमाणे घराच्या अवतीभवती नारळाचे आंब्याचे केळीचे अशी खूप सारी झाडे लावलेली आहेत झाडांच्या यादीमध्ये आम्ही आमच्या घराजवळ वीस प्रकारची विविध झाडे लावलेली आहेत जेणेकरून बाजारपेठेमधून कोणत्याही प्रकारचे फळे आणायची कधी गरज पडत नाही.

घराजवळच आमचे शेत असल्यामुळे शेतामध्ये आम्ही फळबाग लावलेली आहेत आम्ही जेव्हा घरावर जातो तेव्हा आम्ही फळबागांवर घरावरून लक्ष ठेवू शकतो आणि फळबाग असल्याकारणाने देखील आम्हाला फळांची कधीच टंचाई जाणवत नाही. घराजवळ एक लिंबाचे मोठे झाड देखील आहेत त्या झाडाला आम्ही झोका बांधलेला आहेत त्याचप्रमाणे झाडावर चढण्यासाठी आम्ही खूप चांगल्या प्रकारे तयार केलेले आहेत जेणेकरून आम्ही त्या झाडावर सहजासहजी जाऊ शकतो मजा घेऊ शकतो. गावाकडचे घर म्हणलं की गाई तर येतात तसेच आमच्या घरी देखील गाय आहेत ती गाय आम्हाला दररोज शुद्ध दूध देते गाई साठी देखील आम्ही गोठा बनवलेला आहे त्यामध्ये गाय अतिशय मजेत राहते.

माझे घर हे गावाकडे असले तरी देखील शहरातील घरांपेक्षा खूप चांगलं असं बनवलेलं आहेत त्याच पद्धतीने निसर्ग देखील खूप चांगला आहेत आमच्या घरावरती किंवा घरामध्ये हवा ही खूप खेळती असते गाड्यांचा कोणत्याही प्रकारचा आवाज येत नाही कारण घराजवळ कोणत्याही प्रकारचा मोठा रस्ता नाही त्याच पद्धतीने आमच्या घरावर आम्ही सोलर पॅनल बसवलेले आहेत जेणेकरून लाईट नसताना देखील आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.

गावाकडचे घर असले तरी देखील गावातील लोकांनी मुलांसाठी एक मैदान बनवलेले आहेत त्या ठिकाणी आम्ही सर्वजण खेळण्यासाठी जातो त्या मैदानामध्ये आम्हाला सर्व प्रकारचे खेळ खेळण्यासाठी मिळतात आणि गार्डन म्हणून आम्ही घराशेजारी लावलेली झाडे त्यांच्याकडे जातो त्यांचीच काळजी घेतो जेणेकरून ते आम्हाला फळ देतात माझे घर हे निसर्गरम्य घर असून मला माझे घर खूप आवडते.

माझे घर निबंध मराठी | My House Essay in Marathi

मित्रांनो आपल्याला सर्वांना माझे घर मराठी निबंध कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा त्याचप्रमाणे मी तुम्हाला गावाकडचे घर मराठी निबंध दिलेला आहेत तर तुम्ही कोणी शहरांमध्ये राहत असाल तर तुम्ही मला नक्की शहरांमधील जीवनांविषयी माझे घर कसे आहेत म्हणजेच तुमचे घर कसे आहेत यावर निबंध बनवून मला कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील याचा फायदा होईल.

मित्रांनो आपण या वेबसाईटवर खूप सारे निबंध वाचत असाल जर आपण या वेबसाईटवर पहिल्यांदा आला असाल तर मी तुमचे स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आपल्या या वेबसाईटवर खूप साऱ्या प्रकारचे निबंध आम्ही टाकलेले आहेत जेणेकरून ते निबंध आपल्याला खूप सारी माहिती देण्याचे काम करतील तुम्ही ते नक्की वाचा एवढा बोलूनच मी आज थांबतो धन्यवाद.

Leave a Comment